मुंबई: आयुर्वेदात मध आणि काळी मिरीचे सेवन फायदेशीर मानले जाते. थोडीशी काळी मिरी मधामध्ये मिसळून खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात. हे दोन्ही औषधी गुणांनी भरलेले आहे. यामुळे सर्दी, खोकला आणि मोसमी आजार बरे केले जाऊ शकतात.
मधामध्ये व्हिटामिन के, आर्यन, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखी गरजेची व्हिटामिन आणि मिनरल्स असतात तर काळ्या मिरी आणि मधामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात. या गुणांमुळे मोसमी आजार, थंडीत सांधेदुखी, सूज आणि अनेक समस्यांचा इलाज करता येतो.
पोषकतत्वांचे भांडार असलेली काळी मिरी आणि मध डायबिटीज तसेच कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यास मदत होते. एक चमचा शुद्ध मधात एक चमचा वाटलेली काळी मिरी घ्या. हे चाटण खा. यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नका. यामुळे घश्यातील कफ, श्सासातील दुर्गंधी या समस्या बऱ्या होतात.
श्वासासंबंधित समस्यांमध्ये आराम मिळवण्यासाठी तुम्ही मध, काळी मिरी तसेच तुळशीच्या पानांच्या रसाचे सेवन करा. यामुळे श्वासासंबंधित समस्या कमी होऊ शकतात. यामुळे अॅलर्जीही दूर राहण्यास मदत होते. खासकरून अस्थमा आणि श्वासासंबंधित समस्यांनी पीडित लोकांना याचा फायदा होईल.