Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीBloodBank : राज्यात रक्ताचा तुटवडा; चार दिवस पुरेल इतकाच साठा

BloodBank : राज्यात रक्ताचा तुटवडा; चार दिवस पुरेल इतकाच साठा

मुंबई : एकापाठोपाठ आलेल्या सणांच्या सुट्ट्या आणि विधानसभा निवडणूक यामुळे राज्यामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन कमी झाले आहे. परिणामी, राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, मुंबईसह राज्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. ही परिस्थिती लक्षात घेत राज्य रक्त संक्रमण परिषदेने ३१ जानेवारी २०२५ पर्यंत परराज्यात रक्त हस्तांतरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे राज्यातील रक्तपेढ्यांनी परराज्यातील रक्तपेढ्यांना रक्त विक्री केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. रक्तपेढ्यांकडून रक्त मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांनी राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे केल्या आहेत.

Assembly election: राज्यात २८८ विधानसभा जागांसाठी मतदानाला सुरूवात, झारखंडमध्येही दुसऱ्या टप्प्यात मतदान

राज्यात मोठी आपत्ती घडल्यास रक्त तुटवडा प्रकर्षाने जाणवू शकतो. असे असतानाही राज्यातील काही रक्तपेढ्या त्यांच्याकडील अतिरिक्त रक्त व रक्त घटक यांची मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहेत. ही बाब लक्षात घेत रक्तपेढ्यांनी राज्यातील रक्ताच्या गरजेला प्राधान्य द्यावे. अशी भूमिका राज्य रक्त संक्रमण परिषदेने घेतली आहे.

या सूचनांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या रक्तपेढ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. स्वप्निल लाळे यांनी सांगितले. रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी गृहनिर्माण संस्था संकुलामध्येही शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचना रक्तपेढ्यांना देण्यात आल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -