Ellon Musk: आता इंटरनेट सेवांचा दुर्गम भागातही वाढणार वेग

इलॉन मस्क यांनी लाँच केलं भारतासाठी नवं सॅटलाईट


फ्लोरिडा : भारताचे अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटॅलाइट GSAT-N2 अवकाशात झेपावले आहे. भारतीय अंतराळ संशोधन (ISRO) संस्थेचे हे सॅटेलाईट उद्योगपती इलॉन मस्क यांनी SpaceX यांच्या Falcon 9 रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आले आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप कार्निव्हल येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. याचे कार्य सुरू झाल्यानंतर भारताची दळणवळण व्यवस्था अधिक बलशाली होईल, असे सांगितले जात आहे.


भारताचे स्वतःचे रॉकेट मार्क-3 हे केवळ 4,000 किलो वजनाचे सॅटेलाइट अथवा उपग्रह अवकाशात घेऊन जाऊ शकते. मात्र, GSAT-N2 चे वजन 4,700 किलो एवढे आहे, जे खूप अधिक आहे. यामुळे इस्रोने स्पेसएक्स या अमेरिकन कंपनीची मदत घेण्याचा निर्णय घेतला. SpaceX चे रॉकेट मोठे आणि शक्तिशाली आहेत. यामुळे ते GSAT-N2 अवकाशात पाठवू शकले. इस्रोसाठी दुसऱ्या कंपनीचे रॉकेट वापरण्याची ही पहिलीच वेळ असेल.



या सॅटेलाइटच्या सहाय्याने दुर्गम भागांतही इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. या सॅटेलाइटचे मिशन लाइफ 14 वर्षांचे आहे. यासंदर्भात ISRO चे प्रमुख एस सोमनाथ यांनी ही माहिती दिली. लॉन्चिंग दरम्यान ते म्हणाले, "GSAT 20 चे मिशन लाइफ 14 वर्षं एवढे आहे आणि जमिनीवरील पायाभूत सुविधा सॅटेलाइटच्या मदतीसाठी तयार आहे."


आतापर्यंत भारतात फ्लाइटमध्ये इंटरनेट वापरण्याची परवानगी नव्हती. मात्र, आता सरकारच्या बदलत्या नियमांनुसार इंटरनेट वापरण्यास परवानगी आहे . आता विमान 3000 मीटर एवढ्या उंचीवर पोहोचल्यानंतर प्रवाशांना आपल्या मोबाईलवर इंटरनेट चालवता येईल. याच बरोबर, प्रवाशांना वाय-फायच्या माध्यमाने इंटरनेट सेवा वापरण्याची परवानगी तेव्हाच दिली जाईल, जेव्हा त्या उंचीवर पोहोचल्यानंतरही विमानात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापराची परवानगी दिली जाते, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.


Comments
Add Comment

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.

सिंधुदेशाच्या मागणीवरून वातावरण तापलं, पाकिस्तानची फाळणी होणार ?

इस्लामाबाद : सिंधी संस्कृती दिनाचे औचित्य साधून कराचीमध्ये 'सिंधुदेश'च्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या

कट्टरतेकडे झुकत असलेला बांगलादेश होत आहे कर्जबाजारी

  ढाका : बांगलादेशमध्ये शेख हसिना यांचे बहुमतातले सरकार होते. पण शत्रू देशांच्या मदतीने बांगलादेशमधील

मुलीसाठी नग्न होऊन युद्धाचा भयंकर खेळ, जीव जाईपर्यंत… लग्नाची अजब परंपरा माहिती आहे का

  इथिओपिया : आफ्रिकेतील जमाती आपल्या खास परंपरांसाठी चर्चेत असतात. यातील काही परंपरा या खूप विचित्र असतात. आज

Operation Sagar Bandhu | ‘ऑपरेशन सागर बंधू’ जोरात; श्रीलंकेत भारताचे मदतकार्य वेगाने सुरू

नवी दिल्ली : श्रीलंकेत चक्रीवादळ ‘दितवाह’मुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला . मुसळधार पावसाने आणि भूस्खलनामुळे

इजिप्तमध्ये सापडले तीन हजार वर्षांपूर्वीचे ‘सोन्याचे शहर’

उत्खननात सोने वितळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या भट्ट्यांचा समावेश कैरो : जगभरातील