
मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक धमकीचा दूरध्वनी आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःला ‘लश्कर-ए-तोयबा’चा विशेष कार्यकारी अधिकारी असल्याचा दावा केला. त्या व्यक्तीने आपण लश्कर-ए-तोयबाचा सीईओ आहे, बँक बंद करा, मोटरगाडी धडक देणार आहे, अशीही धमकी दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

PHD PET Exam : विद्यार्थ्यांचा खोळंबा! परीक्षेची वेळ उलटूनही अनेक विद्यार्थी केंद्राबाहेर उभे
नेमकं कारण काय? मुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे (Mumbai University) आज पीएचडी पूर्व परीक्षेची पेट परीक्षा (PHD PET Exam) आयोजित करण्यात आली होती. मात्र या परीक्षेबाबत ...
अधिक माहिती अशी की, हा दूरध्वनी शनिवार सकाळी सुमारे १० वाजता आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेच्या सुरक्षा रक्षकाने माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, हा एक खोडसाळपणा असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.
यावर्षी विमानतळावर अनेक धमक्याचे संदेश आले होते. त्या प्रकारणी २० गुन्हे दाखल आहेत. गेल्यावर्षीही अफवांचे सुमारे १०० दूरध्वनी मुंबई पोलिसांना आले होते. यावर्षी जुलै महिन्यापर्यंत ३५ दूरध्वनी मुंबई पोलिसांना प्राप्त झाले आहेत.