Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीPHD PET Exam : विद्यार्थ्यांचा खोळंबा! परीक्षेची वेळ उलटूनही अनेक विद्यार्थी केंद्राबाहेर...

PHD PET Exam : विद्यार्थ्यांचा खोळंबा! परीक्षेची वेळ उलटूनही अनेक विद्यार्थी केंद्राबाहेर उभे

नेमकं कारण काय?

मुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे (Mumbai University) आज पीएचडी पूर्व परीक्षेची पेट परीक्षा (PHD PET Exam) आयोजित करण्यात आली होती. मात्र या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांचा खेळखंडोबा झाला असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई विद्यापीठानुसार आयोजित केलेल्या चारही विद्याशाखांमधील विविध ७७ विषयांसाठी पेट परीक्षा होणार होती. आज सकाळी साडे दहा ते दुपारी साडे बारा अशी या परीक्षेची नियोजित वेळ होती. पण अद्यापही विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही.

Chandrakant Kulkarni : चंद्रकांत कुलकर्णी यांच्या नाट्यप्रवास पुस्तकाची द्वितीय आवृत्ती प्रकाशित!

तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचा खोळंबा

काही तांत्रिक अडचणी आणि आयडी पासवर्ड नसल्यामुळे परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर जमले आहेत. कांदिवलीतील ठाकूर कॉलेजसह डोंबिवलीतील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -