मुंबई: भारतीय सिने इंडस्ट्रीमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी(Rich Actress) बोलायचे झाल्यास तर अनेक नावे समोर येतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की इंडियन सिनेमामधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत याचे उत्तर मिळाले आहे. ४६०० कोटींच्या संपत्तीसह जुही चावला श्रीमंत अभिनेत्री बनली आहे. मात्र इतिहासामध्ये अशीही एक अभिनेत्री होती जी जुही चावलापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत होती.
१० हजारापेक्षा अधिक महागड्या साड्या, २८ किलोंपेक्षा अधिक सोन्याचे दागिने आणि एकापेक्षा एक महाग चपला, सँडल्स. हे सगळं ऐकल्यावर एखाद्या राजकुमारी अथवा महाराणीचा वॉर्डरोब आहे असे वाटते. मात्र हे सर्व एका भारतीय सिने इंडस्ट्रीतील अभिनेत्रीकडे होते. आम्ही बोलत आहोत तामिळ आणि तेलुगु सिनेमातील अभिनेत्री जयललिताबद्दल.
वयाच्या १५व्या वर्षापासून अभिनेत्रीने आपल्या करिअरला सुरूवात केली. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक हिट सिनेमे दिले. जयललिता या सुपरस्टार एमजीआर यांना आपले गुरू मानत होत्या. एकट्या एमजीआर यांच्यासोबत जयललिता यांनी २८ सिनेमांमध्ये काम केले होते.
जयललिता यांनी सिने इंडस्ट्रीमधून बक्कळ पैसा कमावला होता. मात्र त्यांची खरी संपत्ती राजकारणात एंट्री झाल्यानंतर मिळाली. एकदा जयललिता यांच्या घरी सीबीआयचा छापा पडला होता. या छापेमारीत जयललिता यांच्या घरातून जे निघाले होते ते पाहून सारेच आश्चर्यचकित झाले होते.
सीबीआयच्या छापेमारीत जयललिता यांच्या घरातून २८ किलो सोने, १० हजाराहून अधिक महागड्या साड्या आणि ७५० जोडी महागड्या चपला जप्त करण्यात आल्या होत्या. १९९७मध्ये हा छापा टाकण्यात आला होता. यानंतर जयललिता यांच्यावर आरोप होते की त्यांनी आपली संपत्ती १९९ कोटी रूपये दाखवली होती. मात्र त्यावेळेस त्यांची संपत्ती ९०० कोटी रूपयांपेक्षा अधिक होती. ही संपत्ती आजच्या हिशेबाने पाहिल्यास ५ हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…