शेअर बाजारात ८७ लाखांची फसवणूक

पुणे: शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तिघांची ८७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार उंड्री भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारा संदेश पाठविला होता.



चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारातील विविध योजनांची माहिती देऊन जाळ्यात ओढले. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यात ज्येष्ठ नागरिकाने वेळोवेळी ३६ लाख ५२ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.


शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी कोंढवा भागातील आणखी एकाची १६ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शेख तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील खड्डे बुजवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; प्री-कास्ट पॅचने दुरुस्तीला सुरुवात

पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने

Ahilyanagar Crime : गौण खनिज माफियांवर कारवाईचा हातोडा, अहिल्यानगरमधील ६३ क्रशर सील

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर तालुक्यातील खडीकरण केंद्रांवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील सर्व ६३

Pune RTO : पुणेकरांसाठी मोठी बातमी! ‘MH 12’ ची जागा आता ‘MH 61’ घेणार? वाहनांच्या नंबरबाबत मोठा बदल

पुणे : पुणेकरांची खास ओळख बनलेली ‘MH 12’ वाहन क्रमांक मालिका आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. पुण्यात वाहनांची

Chhatrapati Sambhajinagar Suicide : 'तुला Iphone 15 Pro देतो, खाली ये बाळा'... डोंगराच्या कड्यावरून आई-वडिलांची आर्त हाक

डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही अंत छत्रपती संभाजीनगर :

Maharashtra Weather Alert : श्रावणसरी गायब! महाराष्ट्रावर पावसाचे संकट; पुढील काही दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज

मुंबई : ऑगस्ट महिन्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी संपला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक

11th Admission Special Round : इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची विशेष फेरी सुरु; संपूर्ण वेळापत्रक जाहीर

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न