नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) गेल्या अनेक दिवसांपासून प्रदूषणाचा (Pollution) गंभीर धोका निर्माण झाला आहे. आज सकाळीही दिल्लीत प्रदूषणाची अत्यंत धोकादायक पातळी नोंदवली गेली. सकाळी ७ वाजता दिल्लीतील १० हून अधिक स्थानकांवर हवा गुणवत्ता निर्देशांकाची ४००+ नोंद झाली. जहांगीरपुरीमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांकाने ४४५ ची सर्वोच्च पातळी गाठली. सध्या दिल्लीतील सामाईक हवा गुणवत्ता निर्देशांक ४३६ गंभीर स्थितीत आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत दरवर्षीच्या हिवाळ्यात तेवढ्याच नेमेची येणाऱ्या प्रदूषणाने या आठवड्यात कळस गाठला आहे. धूर आणि धुक्याचे मिश्रण असलेल्या विषारी धुरक्याचा पडदा शनिवारी सलग पाचव्या दिवशी साऱ्या दिल्लीला वेढून राहिल्याने डोळे जळजळणे, खोकला, शिंका येणे, सर्दी, उलट्या, श्वासोच्छवास करण्यास त्रास होणे या समस्यांनी दिल्लीकरांना, त्यातही लहान मुलांना हैराण केले.
प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अतिशी (Atishi Marlena) यांनी सरकारी कार्यालयांच्या नव्या वेळा जाहीर केल्या आहेत. केंद्र सरकारची कार्यालये सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत, दिल्ली सरकारी कार्यालये सकाळी १०ते सायंकाळी ६.३० आणि एमसीडी कार्यालये सकाळी ८.३० ते सायंकाळी ५ या वेळेत काम करतील, असे त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील सर्व प्राथमिक (इयत्ता पाचवीपर्यंत) शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू करण्याची घोषणा शुक्रवारीच करण्यात आली होती. आता दिल्लीतील सहावी ते बारावीपर्यंतच्या शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात दिल्ली सरकारकडून घेण्यात आला आहे.
सरकारने (Delhi Government) लोकांना खाजगी वाहने न चालवण्याचे आवाहन केले आहे. यासाठी १०६ अतिरिक्त क्लस्टर बस आणि मेट्रोच्या ६० ट्रिप वाढवण्यात आल्या आहेत, जेणेकरून लोक खाजगी वाहनांचा कमी वापर करतील. एअर कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटनेदेखील एनसीआरमधून येणाऱ्या बसेसला म्हणजेच हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून दिल्लीला येण्यास बंदी घातली आहे. आगामी किमान आठवडाभर तरी धुरके आणि प्रदूषणाचा दुहेरी फटका दिल्लीकरांना सहन करावा लागू शकतो.
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…