खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील आदित्य ठाकरेच्या सभेनंतर त्यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे बर्फावर झोपायची भाषा कोणाला करतो, तू बर्फाच्या लादीवर झोपवण्याच्या गोष्टी करतोस. तुझी लायकी आहे का हे सगळं बोलण्याची? आधी तुझ्या बापाला जाऊन विचार, राज ठाकरे आणि नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर तुझा बाप कारच्या पुढच्या सीटवर मला बसवल्याशिवाय मातोश्रीतून बाहेर पडत नव्हता. मी नसतो तर तुझ्या बापाची ** *** असती आणि तू मला लादीवर झोपवण्याच्या गोष्टी करतोस. मी गृहराज्यमंत्री होतो. पोलीस खातं मी सांभाळलं आहे. कोणाला कसे फटके द्यायचे, कोणाला लादीवर झोपवायचं हे सर्व मला माहिती आहे. तुला अजून खूप दिवस बघायचे आहेत, खूप पावसाळे काढायचे आहेत, अशा खरमरीत शब्दांत रामदास कदम यांनी आदित्यला सज्जड इशारा दिला.
दिशा सालियानचे प्रकरण मी पुन्हा काढणार, रात्री बारा वाजता जातोस सकाळी पाच वाजता येतो, तुझे धंदे काय? हे सगळे समजले पाहिजे. लादीवर झोपायच्या गोष्टी कोणाला करता, अरे तुमचं पक्षासाठी योगदान काय? कोण आहेस तू? असा खडा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे. आपलं वय किती, आपण कुणाबद्दल काय बोलतोय, याचं भान तरी जरा ठेव, अशा शब्दात रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आदित्यला सुनावले आहे.
आपलं सरकार आलं की यांना मी बर्फाचे लादीवर झोपवतो असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी दापोलीतील सभेत केलं होतं. त्या वक्तव्याचा समाचार घेताना रामदास कदम यांनी आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
आदित्य ठाकरेचा एकेरी उल्लेख करत कदम म्हणाले, “आदित्यला जनाची नाही, मनाची तरी लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणण्याची त्याची हिंमत झाली नसती. योगेश आदित्यला त्याचा मित्र समजत होता. मात्र, तो काही वर्षांपूर्वी दापोलीत आला आणि त्याने योगेशच्या सर्व कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली. दापोली नगरपरिषदेसाठी त्याने योगेशला एकही एबी फॉर्म दिला नाही. स्थानिक आमदाराला बाजूला ठेवले. ही गद्दारी करताना तुला लाज वाटली नाही का? योगेशच्या पाठीत खंजिर खुपसताना तू गद्दारी केली नाहीस का?”
काका काका मला तू म्हणत होतास. पण बेइमानी करत माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझ्याकडून शिकलास आणि माझ्याकडे जे पर्यावरण खाते होते तेच खाते तू घेऊन बसलास. बेइमानी करत काकाच्या पाठीत खंजीर खूपसलेस. आदित्यजी त्यामुळे गद्दाराची भाषा तुम्ही बोलू नका गद्दारी तुम्ही केलीत, गद्दार तू आहेस. त्यामुळे काय बोलतोय हे लक्षात ठेव. आपण काय बोलतोय याचे जरा प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे, असाही सल्ला रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेला दिला आहे.
पहिल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांनी विकासाला फक्त भोपळा दिला. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोट्यवधी रुपयांचा विकासासाठी खोके हे एकनाथ शिंदे यांनी कोकणासाठी दिले. म्हणूनच योगेश कदम गेल्या अडीच वर्षात अडीच हजार कोटी रुपयांचा निधी आमच्या महायुतीच्या सरकारच्या काळात त्यांनी आणला. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांचे आभार मानतो. आणि आदित्य तुम्ही इथे येऊन कितीही जरी कावकाव केलीत तरी योगेश कदम पन्नास हजारच्या मताधिक्याने निवडून येईल असा ठाम विश्वास रामदास कदम यांनी यावेळी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे आतापर्यंत खोके खोके असे म्हणत होते पण त्या ठाकरेंचे खोक्यांशिवाय काही चालत नाही. जिसको कमला होती है उसको दुनिया पिली दिखती है, अशीच अवस्था उद्धव ठाकरे यांची असल्याची टीका कदम (Ramdas Kadam) यांनी केली आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…