Monday, December 9, 2024
Homeक्रीडाTilak Varmaने तोडला १४ वर्षांचा जुना महारेकॉर्ड

Tilak Varmaने तोडला १४ वर्षांचा जुना महारेकॉर्ड

मुंबई: तिलक वर्मा(Tilak Varma) १३ नोव्हेंबरला सेंच्युरियन येथील टी-२०मध्ये वेगळ्याच रंगात होता. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात जबरदस्त शतक ठोकले होते. यानंतर जो जल्लोष झाला तो पाहण्यालायक होता.

तिलकने सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये ५१ बॉलमध्ये शतक ठोकले. भारताने २० षटकांत ६ बाद २१९ धावा केल्या. या शतकासह त्याने एक महारेकॉर्डही आपल्या नावे केला आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकणारा सगळ्यात तरूण खेळाडू ठरला आहे. त्याने सुरेश रैनाने केलेला १४ वर्षांचा जुना रेकॉर्ड उद्ध्वस्त केला. तेव्हा रैना २३ वर्षे १५६ दिवस इतक्या वयाचा होता.

तर २२ वर्षीय तिलक वर्मा यशस्वी जायसवालनंतर टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये शतक ठोकणारा दुसरा तरूण खेळाडू ठरला आहे. या स्टार फलंदाजाने या फॉरमॅटमध्ये आपल्या १९व्या सामन्यात पहिले शतक ठोकले.

तिलक वर्माने(Tilak Varma) १०७ धावांवर नाबाद राहताना आठ चौकार आणि सात षटकार ठोकले. एकूण मिळून तिलकच्या फलंदाजीमध्ये मॅच्युरिटी दिसली. तिलकशिवाय अभिषेक शर्माने भारताकडून या सामन्यात २५ बॉलमध्ये ५० धावांची तुफानी खेळी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -