Gold-Silver Rate Today : सोनं १५ दिवसांत ६ हजार रुपयांनी स्वस्त तर चांदीचे दरही घसरले!

  101

पाहा काय आहेत आजचे दर?


मुंबई : ऐन सणासुदीच्या काळात सोनं चांदीच्या दराने उच्चांक गाठला (Price Hike) होता. मात्र दिवाळी सरताच या आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण (Gold Price Fall) झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील १५ दिवसांत सोनं तब्बल ६ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. तसेच चांदीचेही दर उतरत असल्यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.



आजचे सोन्याचे दर


इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव १ हजार ३१६ रुपयांनी घसरून ७३ हजार ९४४ रुपयांवर आला. २२ कॅरेट सोनं ६७ हजार ७३३ रुपये आणि १० कॅरेट सोनं ५५ हजार ४५८ रुपये आहे.

चांदीची किंमत काय?


मागील महिन्यात चांदीचा दर ९९ हजार १५१ रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर आता चांदीचे दर २ हजार १८९ रुपयांनी घसरुन ८७ हजार ५५८ रुपये प्रति किलो झाला आहे. (Gold-Silver Rate Today)



इतर शहरातील सोन्याचे दर काय?



  • मुंबई, कोलकाता आणि चेन्नई शहरात १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ६९ हजार ३५० रुपये आणि १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ७५ हजार ६५० रुपये आहे.

  • दिल्ली येथे १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ६९ हजार ५०० रुपये आणि १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ७५ हजार ८०० रुपये आहे.

  • भोपाळमध्ये १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ६९ हजार ४०० रुपये आणि १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ७५ हजार ७०० रुपये आहे.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची