Monday, December 9, 2024
Homeताज्या घडामोडीVarsha Usgoankar : मातृभाषा बोलता न येणाऱ्यांना अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी सुनावले...

Varsha Usgoankar : मातृभाषा बोलता न येणाऱ्यांना अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी सुनावले खडे बोल!

सिंधुदुर्ग: अनेकांना मातृभाषेत बोलायला जमत नाही व मातृभाषेत बोलता येत नाही मातृभाषेचा अभिमान असायला हवा असं थेट संदेश देत याबद्दल ते सॉरी म्हणतात यावरून मराठी सिने इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgoankar) यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत मातृभाषा न येणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

गोव्यातील एका कार्यक्रमात वर्षा उसगांवकर बोलत होत्या. आपल्याला मातृभाषेचा अभिमान आहे असं त्यांनी त्यावेळी सांगितलं आणि ती बोलण्यासाठी मला सराव करण्याची गरजच नाही माझी मातृभाषा गोवन कोकणी आहे ही बोलण्यासाठी मला सराव करण्याची गरजच पडत नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गोवामधील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

या सर्व लोकांचं मला आश्चर्य वाटतं

माझी मातृभाषा गोवन कोकणी असून ती भाषा माझे अस्तित्व आहे ती जन्मदात्री आहे तिने मला शिकवलं ‘ती मी कशी विसरू शकता’ असं कोकणी भाषेत थेट सवाल करत जे काही थोडी लोक म्हणतात जसे की सॉरी हा मला कोकणी तितकं येत नाही…सॉरी हा मला मराठी इतकं येत नाही…. या सर्वच लोकांचं मला आश्चर्य वाटतं. अरे जी मातृभाषा तुमची ती तुम्हाला येत नाही आणि तुम्ही कोणाची दिलगिर मागता तुमची मातृभाषा तुम्हाला अवगत नाही तुम्ही काय अमेरिकेत वाढलात का असा खडा सवालचं करत ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी उपस्थित करत लोकांचे कान टोचले आहेत.

Laapataa Ladies : ऑस्करसाठी चित्रपटाचे नावचं बदलले! ‘लापता लेडीज’च्या दिग्दर्शकाने घेतला निर्णय

मातृभाषेचा अभिमान बाळगत ती आपली जन्मभाषा आहे, ती कोणी शिकवण्याची गरज नसते असं सांगत गोवा या त्यांच्या मातृभाषा असलेल्या कोकणीतूनच वर्षा उसगावकर यांनी मातृभाषेबद्दल असलेले प्रेम व त्यांचा अभिमान हा या कार्यक्रमातून अधोरेखित केला आहे. ज्या मातृभाषेत तुम्ही जन्माला आलात ती तुमची जन्मदात्री ती तुम्हाला आलीच पाहिजे त्यासाठी सरावची गरज नाही अशा स्वरूपाचा संदेश देत अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgoankar) यांनी मातृभाषा बोलता न येणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -