Tuesday, December 10, 2024
Homeताज्या घडामोडीLaapataa Ladies : ऑस्करसाठी चित्रपटाचे नावचं बदलले! 'लापता लेडीज'च्या दिग्दर्शकाने घेतला निर्णय

Laapataa Ladies : ऑस्करसाठी चित्रपटाचे नावचं बदलले! ‘लापता लेडीज’च्या दिग्दर्शकाने घेतला निर्णय

मुंबई : मार्च महिन्यात प्रदर्शित झालेला लापता लेडीज (Laapataa Ladies) चित्रपटाने अजूनही प्रेक्षकांच्या मनात वेगळेचं घर निर्माण केले आहे. किरण राव (Kiran Rao) दिग्दर्शित लापता लेडीज या चित्रपटाची निवड ऑस्करसाठी करण्यात आले आहे. ढील वर्षी होणाऱ्या प्रतिष्ठित ऑस्कर सोहळ्यात लापता लेडीज भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. मात्र अशातच दिग्दर्शकाने थेट या चित्रपटाचे नावचं बदलल्याचे समोर आले आहे. (Entertainment News)

‘लापता लेडीज’चे रिब्रँडींग

लापता लेडीज चित्रपटाची टीम आणि अमिर खान प्रोडक्शनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये ‘लापता लेडीज’ च्या नावात बदल करुन ‘लॉस्ट लेडीज‘ (Lost Ladies) असं करण्यात आले आहे. नवा पोस्टर बनवून हा सिनेमा अकॅडमी अवॉर्ड्सकडे पाठवण्यात आला आहे. नावात बदल केल्यामुळे मनोरंजन क्षेत्रात या चित्रपटाच्या नव्या पोस्टरची जोरदार चर्चा सुरु आहे.

Shah Rukh Khan : शाहरुख आणि प्रितीचा रोमांटिक ड्रामा चित्रपटगृहात पुन्हा झळकणार!

दरम्यान, किरण रावचा हा चित्रपट मार्च २०२४ मध्ये ५ कोटींपेक्षा कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात २५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, रवि किशन आणि छाया कदम यांनी भूमिका केल्या आहेत. (Laaptaa Ladies)

 

View this post on Instagram

 

A post shared by Lost Ladies (@lostladiesfilm)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -