Apurva Gore: 'आई कुठे काय करते' फेम अपूर्वाने शेअर केलेल्या 'मोतीचूर लाडू'च्या फोटोचे गुपित काय

मुंबई : गेल्या ४ वर्षांपासून 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे . नवीन येणाऱ्या मालिकांमुळे या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे. या मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या अधिक जवळची झाली होती. मालिकेच्या 'टीआरपी' मध्ये सुद्धा या मालिकेचा नंबर अव्वल आहे. एकीकडे मालिका निरोप घेणार असल्याची चर्चा असतानाच या मालिकेतील अभिनेत्रीने प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे.



'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीची मुलगी ईशा म्हणजेच अपूर्वा गोरे हिने व्यवसायात पदार्पण केले असल्याची पोस्ट सोशल मीडिया वर सध्या चर्चेत आहे. सर्वांची लाडकी ईशा आता 'बिझनेसवुमन' झाली आहे. मात्र, अपूर्वाने कपड्यांच्या किंवा हॉटेल क्षेत्रात पदार्पण न करता एक आगळावेगळा व्यवसाय सुरू केला आहे.




 

अपूर्वाने सोशल मीडिया वर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये दिसणारे मोतीचूर लाडू हे खायचे लाडू नसून ते मेणापासून बनवलेले आकर्षक दिवे आहेत. अपूर्वाने बनवलेल्या कँडल्स या साध्या नसून त्या विशिष्टप्रकारे डिझाइन केलेल्या आहेत. अपूर्वाने तिच्या नव्या व्यवसायाचं नाव व लोगो असलेली पोस्ट शेअर करत “आयुष्यातील कठीण काळात आपल्याला सर्वांना एक सकारात्मक प्रकाश हवा असतो. यासाठी तुम्हा सर्वांबरोबर एक खास गोष्ट शेअर करतेय… तर, हा आहे माझा नवीन ब्रँड ‘Raahat’ By अपूर्वा”





मधुराणी प्रभुलकर, अश्विनी महांगडे, अश्विनी कासार, सीमा घोगळे, गौरी कुलकर्णी या अभिनेत्रींनी कमेंट्स करत अपूर्वाला या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments
Add Comment

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी

अभिनेत्री करिश्माने मारली चालत्या लोकलमधून उडी

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा शर्मा हिचा मुंबईतील चर्चगेट येथे अत्यंत गंभीर अपघात झाला. करिश्मा स्वतःने