नवीन रामगुलाम होणार मॉरिशसचे नवे पंतप्रधान, PM Narendra Modi यांनी दिल्या शुभेच्छा

  87

नवी दिल्ली: संसदीय निवडणुकीत मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. ते म्हणाले की त्यांची युती पराभवाच्या दिशेने जात आहे. ते २०१७ पासून देशाचे पंतप्रधान होते. मीडियाशी बोलताना ते म्हणाले, त्यांची युती मोठ्या पराभवाच्या दिशेने जात आहे. मला देशासाठी जेवढे शक्य होते तेवढे म केले. जनतेने दुसऱ्या पक्षाची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. मी देशाला शुभेच्छा देतो. यातच विरोधी पक्ष नेते नवी रामगुलाम तिसऱ्यांदा कार्यकाळ सांभाळत आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(PM Narendra Modi)शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.


पंतप्रधान मोदींनी लिहिले, आपले मित्र डॉ रामगुलाम यांच्याशी बातचीत झाली. त्यांचे ऐतिहासिक निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन. मॉरिशसचे नेतृत्व करण्यामध्ये यश मिळावे अशी कामना केली. तसेच भारतात येण्याचे निमंत्रण दिले.


 


मॉरिशसच्या संसदेत किती आहेत खासदार


मॉरिशसची जनता संसदेसाठी ६२ खासदारांची निवड करते. येथे रविवारी मतदान झाले होते. बहुमत मिळवण्यासाठी येथे निम्म्यापेक्षा अधिक जागांची गरज असते. जुगनाथ गेल्या महिन्यात युकेसोबत वादग्रस्त चागोस द्वीप समूहाला मिळवण्याशी संबंधित ऐतिहासिक कराराचा जल्लोष करत होते. मात्र एका घोटाळ्याने देशाचे राजकारण बदलले.


Comments
Add Comment

अंतराळवीर शुभांशू शुक्ला मायदेशी परतल्यावर घेणार पंतप्रधान मोदींची भेट

वॉशिंग्टन : अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) मध्ये जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कॅप्टन शुभांशु शुक्ला हे

अमेरिकेत आणखी एका हिंदू मंदिरावर हल्ला

वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका हिंदू मंदिरावर पुन्हा एकदा वांशिक द्वेषाच्या पार्श्वभूमीवर हल्ला करण्यात आला आहे. ही

पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनादरम्यान गोळीबार, ३ जणांचा मृत्यू आणि ६०हून अधिक जखमी

इस्लामाबाद: पाकिस्तान आज म्हणजेच १४ ऑगस्टला आपला ७९वा स्वातंत्रदिन साजरा करत आहे. या खास क्षणाला कराची शहरातील

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये एफ-१६ विमान पाडल्याच्या दाव्यावर अमेरिकेचे मौन

वॉशिंग्टन: भारत आणि पाकिस्तान यांच्यात ७ ते १० मे दरम्यान झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या ८८ तासांच्या संघर्षात

दक्षिण कोरियात माजी राष्ट्रपतींच्या पत्नीला अटक

सियोल : दक्षिण कोरियामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांच्या पत्नी किम केओन यांना शेअर बाजारातील फसवणूक

सोन्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही- ट्रम्प

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली. 'ट्रम्प यांनी सोन्यावर कोणताही कर