Eknath Shinde : गद्दार म्हणताच मुख्यमंत्री शिंदेंची सटकली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात घुसले अन्...

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. अशातच महायुती आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष आता कमालीचा तीव्र झाला आहे. सोमवारी मुंबईच्या चांदिवली परिसरात याचा प्रत्यय आला. सोमवारी रात्री या परिसरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा ताफा जात होता. चांदिवली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नसीम खान हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकनाथ शिंदे यांचा ताफा त्यांच्या कार्यालयाबाहेरुन जात होता. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी 'गद्दार, गद्दार'च्या घोषणाही देण्यात आल्या. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून संतोष कटके या तरुणाने अपशब्द वापरले. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या संतापाचा पारा चढलेला पाहायला मिळाला.



नेमकं प्रकरण काय?


मुख्यमंत्री शिंदेंचा रौद्रावतार कॅमेरामध्ये चित्रित झालेला आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. काल संतोष कटके यानी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला आणि त्याने 'गद्दार गद्दार' अशा घोषणा केल्या होत्या. गद्दार घोषणा देणाऱ्यांवरती मुख्यमंत्री शिंदे संतापले. संतोष कटके जो कार्यकर्ता होता त्याने काही अपशब्द मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी वापरले. मुख्यमंत्री त्यामुळे प्रचंड चिडले. गाडीतून रागातच ते खाली उतरले आणि समोर असलेल्या नसीम खान यांच्या कार्यालयात रंगात चालत गेले. तेथील काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना, 'ऐसा सिखाते हे क्या आप लोग?', अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी जाब विचारला. यानंतर संतोष कटके आणि काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र, नंतर त्यांना सोडून देण्यात आले.



संतोष कटकेला ठाकरेंची फूस


संतोष कटकेचे वडील साधू कटके हे आरपीआय (आठवले गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. संतोष कटके यांनी थेट मुख्यमंत्र्यांचा ताफा आडवल्यामुळे त्याला उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावून घेतले. आज संतोष कटके हे सकाळीच मातोश्रीवर गेले होते. यावेळी संतोष काटके यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.


Comments
Add Comment

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि