Kartiki Ekadashi: कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात दोन लाख भाविक दाखल

विभागीय आयुक्तांना मिळाला शासकीय महापूजेचा मान


सोलापूर : कार्तिक शुद्ध एकादशी(Kartiki Ekadashi) १२ नोव्हेंबर २०२४ रोजी असून, या कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दोन लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाल्याची माहिती पेालिसांनी दिली. दरम्यान, यंदा कार्तिक आषाढी यात्रेतील शासकीय महापूजेचा मान पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना मिळाला आहे. त्यांच्यासोबत मानाचे वारकरी उपस्थित राहणार आहेत.


दरम्यान, दरवर्षी कार्तिक यात्रेतील शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्री यांना असतो. मात्र यंदा आचारसंहिता असल्याने उपमुख्यमंत्र्यांऐवजी महापूजेचा मान विभागीय आयुक्तांना मिळाला असल्याचे मंदिर समितीने सांगितले. आषाढी यात्रेच्या अनुषंगाने पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढत आहेत. पालख्यांचे आगमन होत आहे, ६५ एकर परिसरात वारकरी मोठया संख्येने दिसून येत आहेत. पंढरपूर शहरात गर्दी वाढत असून विठ्ठलाची दर्शनरांग पत्राशेडपर्यंत गेली आहे.


कार्तिक एकादशीच्या(Kartiki Ekadashi) वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी १ हजार ६२६ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये जड वाहतुक शहराबाहेरुन वळविण्यात आली आहे . तसेच वाहतुक नियमनासाठी १३ ठिकाणी डायव्हरशन पॉईट सुरु करण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या मदतीसाठी सावरकर चौक, शिवाजी चौक, चंद्रभागा वाळवंट तसेच अंबाबाई पटांगण येथे तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. वारकरी भाविकांना आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.

Comments
Add Comment

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क