Tuesday, December 10, 2024
Homeताज्या घडामोडीश्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून तुळजापूर बोधचिन्ह निवडण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून तुळजापूर बोधचिन्ह निवडण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन

धाराशिव: श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांचेकडून मंदिर संस्थांचे बोधचिन्ह तयार करण्यासाठी क्रिएटिव्ह डिझाईन मागवण्यात आल्या होत्या. यासाठी १९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष या बोधचिन्ह तयार करणाऱ्या व्यक्तींचे सादरीकरण होऊन ते बोधचिन्ह मतदानासाठी मंदिर संस्थानच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले होते. त्या बोधचिन्हावर (logo) मतदान करण्याचे आवाहन तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे व्यवस्थापक यांनी केले आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे बोधचिन्ह  तयार करण्यासाठी मागवण्यात आलेल्या बोधचिन्हाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या व्यक्तीसोबतच संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या ईओआयनुसार २३ सप्टेंबरपर्यंत इमेलवर लोगो सादर करणारे व्यक्ती यांचे लोगो विचारात घेऊन त्यानुसार सर्व लोगो वोटींगसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत. या सर्व लोगोंना सर्व जनतेने मतदान करावे यासाठी सर्व बोधचिन्ह (लोगो) मंदिराचे संकेतस्थळावर उपलब्ध आहेत . भाविकांनी मतदान करणेसाठी https://shrituljabhavanitempletrust.org या संकेतस्थळावरील होमपेजवर सर्व लोगो वोटींग या लिंकवर जाऊन लोगोची पाहणी करून पसंत असलेल्या लोगोसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मतदान करावे, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -