मुंबई : रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) रेल्वे रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेची कामे करण्यासाठी दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. उद्या देखील तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक (Railway Megablock) घेण्यात येणार आहे. या कालावधील अनेक लोकलसेवा रद्द करण्यात आल्या असून विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांचा खोळंबा टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून याबाबतचे वेळापत्रक जारी केले आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे.
ठाणेहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.
या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
कुठे : सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर
कधी : ११.१० ते ४.४० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी, वडाळ्याहून वाशी, बेलापूर, पनवेलकरिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटीहून वांद्रे, गोरेगावसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे.
पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सीएसएमटीकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहील.
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…