कहरचं! दोन महिलांनी कुत्र्याच्या पाच पिल्लांना जिवंत जाळलं!

उत्तर प्रदेश : माणुसकी नावाची गोष्टीचं राहिली नाही... उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे दोन महिलांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल आहे. खरं तर या महिलांना कुत्र्याच्या पिल्लांचा आवाज सहन न झाल्यामुळे त्यांनी धक्कादायक घटना घडवून आणली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपी महिलांना कुत्र्याच्या ५ पिल्लांच्या आवाजाचा त्रास होत होता म्हणून त्यांनी पिल्लांना जिवंत जाळले आणि त्यांना गाढून टाकण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी एफआयर नोंदवला असून, पुढील तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितले.


या २ महिला आरोपींनी लहान पिल्लांवर पेट्रोल टाकून त्यांचा जीव घेतला. मेरठमधील कांकरखेडा परिसरात ही घटना घडली. आरोपी महिला राहत असलेल्या घराजवळील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिथे राहणाऱ्या भटक्या कुत्र्याची लहान पिल्ले खूप जोरात ओरडत होती. त्यांचा आवाज सहन न झाल्याने संबंधित महिलांनी त्यांना ठार केले.




माणुसकीला काळीमा फासणारी घटना


वरिष्ठ पोलीस अधिकारी जितेंद्र कुमार यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अंशुमली यांच्या तक्रारीवरुन २ महिलांविरोधात एफआयर नोंदवण्यात आला आहे. आरोपी शोभा आणि आरती या दोघींची अधिक चौकशी सुरू आहे. या दोघींवर भारतीय दंड संहिता कलम ३२५ अंतर्गत मुक्या प्राण्यांना त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही अधिक माहिती घेत असून आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ५ नोव्हेंबरला रोहता रोडजवळील संत नगर कॉलनीत ही घटना घडली. एका भटक्या श्वानाने अलीकडेच ५ पिल्लांना जन्म दिला. त्यांचा आवाज सहन न झाल्याने आरोपींनी पेट्रोल टाकून जाळले.

Comments
Add Comment

प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले हवीतच; चंद्राबाबू नायडूंचं विधान चर्चेत

तिरुपती : तिरुपती येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी

वाढदिवसाची पार्टी, धुम्रपानास जबरदस्ती अन् कारमध्ये बलात्कार!

उदयपूरमधील आयटी कंपनीच्या मॅनेजरची 'ती' काळरात्र उदयपूर: राजस्थानमधील उदयपूर येथे एका खाजगी आयटी कंपनीच्या

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,

चीनच्या उत्पादनांवर ‘अँटी-डंपिंग’ शुल्क

केंद्र सरकारचा धाडसी निर्णय नवी दिल्ली : देशातील स्थानिक उद्योगांना बळ देण्यासाठी आणि 'ईज ऑफ डूइंग बिझनेस'ला