Railway Accident : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा रेल्वे अपघात! सिकंदराबाद-शालीमार एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले

  99

कोलकाता : देशभरात रेल्वे अपघातांचे (Railway Accident) सत्र सुरूच असल्याचे दिसून येते. आज पुन्हा पश्चिम बंगालमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. सिकंदराबाद-शालीमार सुपरफास्ट एक्स्प्रेसचे (Shalimar-Secunderabad Express accident) चार डबे रुळावरुन घसरुन भीषण अपघात घडला आहे. यामध्ये अनेक प्रवाशी जखमी झाले असून जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास कोलकाता सिकंदराबाद-शालीमार सुपरफास्ट एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक २२८५०) मध्य मार्गावरून डाऊन लाइनकडे जात असताना एका पार्सल व्हॅनसह इंजिन आणि दोन डबे रुळावरून घसरले. या अपघातात कोणतीही मोठी हानी झाली नाही. मात्र काही प्रवासी जखमी झाले आहेत.


सध्या अपघातस्थळी, संतरागाछी आणि खरगपूर येथून अपघात मदत ट्रेन आणि वैद्यकीय मदत गाड्या तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना कोलकात्याला नेण्यासाठी बसही पाठविण्यात आल्या आहेत, अशी माहिती दक्षिण-पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) ओमप्रकाश चरण यांनी दिली.

Comments
Add Comment

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार