उबाठाचा वचननामा म्हणजे भुलथापा; आधी महिलांचा मानसन्मान राखा मग महाराजांची मंदिरे बांधा

शिवसेना सचिव डॉ. मनिषा कायंदे यांची उबाठावर घणाघाती टीका


महिलांचा वारंवार अपमान करणारे राऊत बंधू दुर्योधन-दुष्यासन


मुंबई : महिलांचा दररोज अपमान करणारे संजय राऊत आणि सुनील राऊत हे दुर्योधन दुष्यासन आहेत, आधी महिलांचा मानसन्मान राखा मग छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे बांधा, अशी घणाघाती टीका शिवसेना सचिव डॉ. मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी उबाठावर केली. मुख्यमंत्री असताना बजेटबद्दल अवाक्षर माहित नसलेल्या उबाठाचा वचननामा म्हणजे भुलथापा आहेत, असे त्या म्हणाल्या. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.


डॉ. कायंदे म्हणाल्या की उबाठाचा वचननाम्यामध्ये महिलांना ३००० रुपये देण्याचे आश्वासन दिले. जेव्हा महायुती सरकारने लाडक्या बहिणांना १५०० दिले तेव्हा याच विरोधकांनी बजेटमध्ये तरतूद केली आहे का? पैसे कुठून आणणार असे प्रश्न विचारले होते. लाडकी बहिण योजनेविरोधात कोर्टातही गेले होते, मग आता ३००० रुपये ते कुठून आणणार आहेत, असा सवाल डॉ. कायंदे यांनी केला. ज्यांना बजेट कळत नाहीत त्यांची आश्वासने म्हणजे भुलथापा आहेत, असा टोला ड़ॉ. कायंदे यांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तुम्ही सोडले म्हणून संजय राऊत, सुनील राऊत, अरविंद सावंत यांच्याकडून महिलांचा अपमान झाला. मात्र याबाबत उद्धव ठाकरे अजूनही गप्प आहेत, अशी टीका डॉ. कायंदे यांनी केली. ज्याप्रकारे महाभारतात दुर्योधन आणि दुष्यासन यांचा अंत झाला तसाच संजय राऊत आणि सुनील राऊत यांचा लाडक्या बहिणी शेवट करतील, असे त्यांनी सांगितले.


काँग्रेसच्या तेलंगणा, हिमाचल, कर्नाटकमधील योजना दीड दोन महिन्यात बंद झाल्या, आमची योजना सहा महिन्यांपासून सुरू आहे. उबाठा महिलांना कुठल्या बसने मोफत प्रवास देणार असा सवाल त्यांनी केला. कुटुंबांना २५ लाखांचा वैद्यकीय विमा देणार या निव्वळ भूलथापा आहेत. कोविडकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी वापरला नाहीत. अडीच वर्षात केवळ फक्त दोन कोटी खर्च केले. मोफत औषध देणार म्हणता मग कोरोनात बॉडीबॅग, रेमडीसिव्हीर का मोफत दिले नाहीत, असा खोचक सवाल डॉ. कायंदे यांनी केला. महाविकास आघाडी वचननाम्याला पंचसूत्री म्हणत असले तरी आमच्यासाठी ते कळसुत्री आहे, असा टोला डॉ. कायंदे यांनी लगावला.


डॉ. कायंदे यांनी राहुल गांधी यांच्यावरही यावेळी टीका केली. राहुल गांधी आरक्षणाची मर्यादा वाढवणार असे बोलतात. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्याचे फेक नरेटिव्ह पसरवले मग आता आरक्षणाची मर्यादा वाढवून तुम्हाला संविधान बदलायचे आहे का,असा सवाल कायंदे यांनी केला. राहुल गांधी यांच्या हातातील लाल पुस्तक नक्की संविधान आहे की आणखी काही ते तपासायला हवं असे त्या म्हणाल्या.



वर्षा गायकवाड यांनी माफी मागावी


मविआच्या मुंबईतील सभेतला एक व्हिडिओ समोर आला आहे. यात छत्रपतींची मूर्ती शरद पवार यांना देण्यासाठी कार्यकर्ता आला असता, वर्षा गायकवाड यांनी स्वत:च्या फोटोसाठी कार्यकर्त्याला बाजूला सारलं आणि महाराजांना झिडकारलं. वर्षा गायकवाड यांनी या कृत्याबाबत माफी मागावी आणि खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी डॉ. कायंदे यांनी केली. काँग्रेसने पंडित जवाहरलाल नेहरुंपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आल्याची टीका डॉ. कायंदे यांनी केली.

Comments
Add Comment

आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या

वंदे भारत एक्स्प्रेसला ६ तास उशीर

मुंबई : वेगवान प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ६ तास विलंबाने धावली. वंदे भारतच्या वेळापत्रकात

भारताने प्राचीन धर्मग्रंथांची िशकवण जोपासावी: मोहन भागवत

सरसंघचालकांच्या हस्ते ‘आर्य युग विषय कोशा’चे लोकार्पण मुंबई : "भारताला प्राचीन विद्या आणि संस्कृतीची मोठी

कफ परेड येथील चाळीत भीषण आग; एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, तीन जण जखमी

मुंबई: मुंबईतील कफ परेड परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण आगीच्या दुर्घटनेत एका १५ वर्षीय मुलाचा

नरकचतुर्दशी : अभ्यंगस्नान आणि नरकासुराचा वध!

मुंबई : आज सर्वत्र दिवाळीच्या उत्साहात नरकचतुर्दशी साजरी होत आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी

दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धीसह सौहार्द घेऊन येवो - उपमुख्यमंत्री पवार

मुंबई : दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि ऐक्याचा सण आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात नव्या आशा, नव्या संधी आणि