Sunday, July 6, 2025

PM Narendra Modi : उद्या पंतप्रधानांची पहिली सभा नाशकात!

PM Narendra Modi : उद्या पंतप्रधानांची पहिली सभा नाशकात!

विकासाचे विचार ऐकण्यासाठी ढोल ताशाच्या गजरात सभेला येण्याचे आवाहन


नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly election 2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची पहिली सभा नाशिक मध्ये होत असून या सभेसाठी आणि विकासाला साथ देण्यासाठी म्हणून ढोल ताशा वाजवत सहभागी होण्याचे आवाहन भाजपाचे महानगरप्रमुख प्रशांत जाधव यांनी केले आहे.


विधानसभा निवडणुकीसाठी राज्यामध्ये रणधुमाळी सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील पहिली सभा नाशिक मधील तपोवन मैदान येथे उद्या दुपारी बारा वाजता होणार आहे. या सभेसाठी प्रशासनासह पक्षाची तयारी देखील झाली असून लाखोच्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत.


याबाबत बोलताना भाजपाचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून नागरिक या सभेसाठी हजर राहणार आहेत. ढोल ताशाच्या गजरात आणि देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी भाजपला साथ देण्यासाठी म्हणून तसेच नरेंद्र मोदी यांची विकासाची रणनीती आणि त्याचे विचार ऐकण्यासाठी म्हणून नागरिक उपस्थित राहतील यात काही शंकाच नाही परंतु नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा