Shah Rukh Khan : सलमान खाननंतर शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी!

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला (Salman Khan) लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. धमकी देण्याचे प्रकरण चर्चेत असताना आता बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान (Shahrukh Khan) यालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या बॉलीवूड क्षेत्रात भीतीचे वातावरण पसरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, फैजान नावाच्या एका व्यक्तीने रायपूरहून शाहरूख खानला धमकीचा फोन केला. या धमकीमध्ये '५० लाख रुपये द्या, नाहीतर जीवे मारुन टाकू' अशी धमकी दिली. धमकी मिळाल्यानंतर मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, शाहरुखने काही दिवसांपूर्वी सलमान खानचीही भेट घेतली होती. तसेच यांचे घर जवळपास असल्यामुळे शाहरुख खानला धमकी देण्यात आली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.


याप्रकरणी पोलिसांचे पथक रायपूरला गेले असून पुढील तपास अद्याप सुरू आहे. तसेच पोलिसांनी मन्नतच्या बाहेर बॅरिकेड्स लावले आहेत. तर शाहरुख खानची सुरक्षाही वाढवली जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Navnath Ban : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; ‘राहुल गांधींच्या रिलाँचिंगसाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक’

मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या सरकारने चर्चेच्या माध्यमातून मान्य केल्या असून, त्यानंतरही

Jal Jeevan Mission : भूजल निधीच्या मनमानी खर्चाला चाप, पाणीटंचाईग्रस्त गावांना मिळणार प्राधान्य; ‘जल जीवन मिशन’ला बळकटी देण्यासाठी विशेष धोरण

मुंबई : केंद्र सरकार, जागतिक बँक आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) भूजल पातळी वाढवण्यासाठी मिळणारा निधी

Sunetra Pawar : बारामतीत 34 कोटींच्या क्रीडा संकुलाची पाहणी; युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय संधी मिळणार, सुनेत्रा पवारांचा विश्वास

बारामती: बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुलामुळे युवा खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा मिळून त्यांना आंतरराष्ट्रीय

Disha Salian case : दिशा सालियन प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे सरकारला सवाल; ‘वडिलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत’

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यू

Devendra Fadnavis : तिबेटमध्ये अडकलेल्या ३७ महाराष्ट्रातील नागरिकांची मुख्यमंत्री फडणवीसांमुळे सुटका

- सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू; ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)