Wednesday, December 4, 2024
Homeताज्या घडामोडीDevendra Fadnavis : राहुल गांधींभोवती अर्बन नक्सलचा गराडा!

Devendra Fadnavis : राहुल गांधींभोवती अर्बन नक्सलचा गराडा!

देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका 

मुंबई : काँग्रेस नेते (Congress) राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भोवती अर्बन नक्सल्सचा गराडा पडला आहे. त्यामुळे राहुल गांधी आता काँग्रेस विचारसरणीचे राहिले नसून अतिडावे बनले आहेत, अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.

आता राहुल गांधी यांची विचारसरणी काँग्रेसची राहिलेली नाही. ते आता डाव्‍या अतिरेकी विचारसणीचे झाले आहे. भारतीय संविधानाची प्रत पारंपारिक निळ्या रंगातील कव्‍हरमध्‍ये असते. राहुल गांधी भारतीय संविधानाची प्रत लाल रंगातीलच कव्‍हर घातलेलीच का दाखवतात? त्‍यांची लोकशाही मूल्‍ये पोकळ आहेत. नागपूर येथे राहुल गांधी यांच्‍या संविधान कार्यक्रमावेळी माध्‍यम प्रतिनिधींच्‍या उपस्‍थितीवर बंदी घालण्‍यात आली होती. ते गुप्‍त बैठकाचे आयोजन करत लोकशाहीचा चौथा स्‍तंभ असणार्‍या माध्‍यमांना त्‍या बैठकांपासून लांब ठेवतात, असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

त्याचबरोबर राज्यघटना हा एक आदेश आहे, अराजकता ही अव्यवस्था आहे. म्हणूनच त्यांच्या कायद्याची प्रत लाल रंगाची आहे. ते लोकशाही बचावाच्‍या केवळ पोकळ गप्पा मारतात, पण लोकशाहीचा चौथा स्तंभ, प्रसारमाध्यमे यांना संविधानावरील बैठकीपासून दूर ठेवतात. राहुल गांधी यांचा मुखवटा आता उतरला जात आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडि आघाडीने २ फेक नरेटीव्‍ह पसरवले. यामध्‍ये पहिले होते भारतीय राज्यघटना धोक्यात होती, आरक्षण संपुष्टात येईल आणि दुसरे होते ‘व्होट जिहाद’. आता भारतीय राज्‍यघटना धोक्‍यात आहे या खोट्या प्रचाराच भंडाफोड झाला आहे. कारण राहुल गांधी यांनी स्‍वत:च अमेरिकेत जावून भारतातील आरक्षण संपवले पाहिजे, असे सांगितले. आरक्षण संपवण्याबाबत अमेरिकेतील त्यांच्या विधानाने सारे काही स्‍पष्‍ट झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी यांच्‍या वक्तव्याचे समर्थन केले. काँग्रेसने ‘व्होट जिहाद’चा वापर करत समाजाचे ध्रुवीकरण केले. भाजपच्या विरोधात मतदान करण्यासाठी फतवे काढण्यात आले आणि लोकांना शपथ देण्यात आली. आता अल्पसंख्याकांना समजले आहे की त्यांची दिशाभूल केली गेली. त्यांचा वापर केला गेला, असे फडणवीस यांनी सांगितले.

अनिल देशमुख यांना आवाहन

महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना नोव्हेंबर २०२१ मध्‍ये अनिल देशमुख तुरुंगात गेले. त्‍यावेळी सरकार त्‍यांचे होते. सरकार सत्तेवर असताना त्यांना कोण त्रास देत होते, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्‍हानही फडणवीस यांनी दिले. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांमध्ये त्यांच्या विरोधात असणार्‍या पुराव्यांचा उल्लेख आहे. न्‍यायालयाने त्‍यांना प्रकृतीच्या जामिनावर सोडले आहे. त्‍यांची निर्दोष मुक्‍तता करण्‍यात आलेली नाही. आता कोणीतरी त्‍यांना माझ्‍यावर टीका करण्‍याचे आदेश दिले. त्‍यानुसार हे काल्‍पनिक आरोप करत आहेत. त्यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून माझ्याविरोधात निवडणूक लढवावी, अशी इच्छाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -