Salman Khan : सलमान खानला जिवंत रहायचं असेल तर...

लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुन्हा धमकी!


मुंबई : अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगने जबाबदारी घेतली होती. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीबाबत सातत्याने अपडेट्स समोर येत आहेत. अशातच अभिनेता सलमान खानला (Salman Khan) लॉरेन्स बिश्नोई गँगकडून (Lawrence Bishnoi Gang) धमकी मिळाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला आलेल्या मेसेजमार्फत लारेन्स बिष्णोईचा भाऊ बोलत असल्याचे सांगत धमकी देण्यात आली आहे. यामध्ये 'सलमान खानला जिवंत रहायचं असेल तर त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी, किंवा पाच कोटी रुपये द्यावे, असे न केल्यास आम्ही त्याला जीवे मारू. आमची गँग आजही सक्रिय आहे', असे लिहले आहे. सोमवारी मध्यरात्री हा मेसेज आला असून मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा शोध सध्या पोलिस घेत आहेत.


सलमान खान काळवीट शिकार प्रकरणामध्ये आरोपी आहे. बिश्नोई समाज काळविटाची पूजा करतो, यामुळे या प्रकरणापासून लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला धमक्या देण्यास सुरुवात केली. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.

अंधेरी रेल्वे स्टेशनवरील धर्मांतराचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल ; पोलीस तपासात आली भलतीच माहिती समोर

मुंबई : सोशल मीडियावर अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतर सुरु असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजपा, शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग

मुंबई (सचिन धानजी): उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मुलुंड विधानसभा मतदार हा संघ भाजपाचा

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजप

युतीमध्ये या विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग सचिन धानजी मुंबई : उत्तर पूर्व