PM Narendra Modi : राजनैतिक अधिकाऱ्यांना धमकवणारे वर्तन खपवून घेतले जाणार नाही!

कॅनडा हिंदू मंदिर हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींचा तीव्र निषेध


ओटावा : दोन दिवसांपूर्वी कॅनडाच्या ब्रेम्प्टन भागात हिंदू मंदिरावर खलिस्तानवाद्यांनी हल्ला केल्याची (Canada Hindu Temple Attack) धक्कादायक घटना घडली. या घटनेबाबत देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीदेखील निषेध व्यक्त केला आहे.


आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना धमकावण्याचे प्रयत्नही, अत्यंत निंदनीय असून, अशाप्रकारचं वर्तन खपवून घेतलं जाणार नाही, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. अशा भ्याड हिंसाचाराच्या घटना भारताच्या दृढनिश्चयाला दुर्बळ करू शकत नाही. अशा हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून, कॅनडातील सरकार कायद्यानुसार कार्यवाही करेल, असे पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्टमार्फत म्हटले आहे. त्याचबरोबर या हल्ल्यानंतर आता कॅनडाने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सांभाळण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले आहे.


दरम्यान, खलिस्तानवाद्यांनी याआधीही भारतीय नागरिक, राजनैतिक अधिकाऱ्यांना लक्ष्य केले आहे. खलिस्तान्यांच्या कृतीवर पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच भाष्य केले असून कॅनडातील खलिस्तानवाद्यांविरोधात भारत ठामपणे उभा असल्याचा संदेश दिला आहे.




Comments
Add Comment

'या' तारखेपासून विंडोज १०चा सपोर्ट होणार बंद

वॉशिंग्टन डीसी :  टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जगभरात मोठ्या

अमेरिकेच्या गाझा शांतता योजनेशी हमास सहमत

वॉशिंग्टन : पॅलेस्टिनी मिलिशिया गट हमासने अमेरिकेच्या गाझा शांतता प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. शांतता

सरकारी निधी थांबल्यामुळे नासातही शटडाऊन

वॉशिंग्टन : अमेरिकेते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर उच्च टॅरिफ लावले असताना, त्यांच्या

Munich Airport : हादरा! म्युनिक विमानतळावर अचानक '१७ रशियन ड्रोन'; तातडीने विमानसेवा बंद

म्युनिक : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध आता केवळ दोन देशांपर्यंत मर्यादित राहिलं नसून, त्यात जगातील अनेक

रशियाच्या दोन मोठ्या निर्णयांमुळे भारताचा फायदा

मॉस्को : भारत रशियातून करत असलेल्या आयातीत वाढ झाली आहे. वाजवी दरामुळे भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेलाची

पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे बेताल वक्तव्य, Pok खेळाडूबाबत म्हणाली असं काही...आता दिले हे स्पष्टीकरण

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि सध्या समालोचक (Commentator) म्हणून काम पाहणाऱ्या सना