मोठी बातमी : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली; निवडणूक आयोगाने...

मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची अखेर बदली झाली आहे. राज्यात विधानसभा निवडणूक होत असताना एक मोठी अपडेट समोर आली आहे. रश्मी शुक्ला महाविकास आघाडी सरकारच्या काळात फोन टॅप केल्याचे आरोप यांच्यावर आहेत. रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीने सातत्याने मागणी लावून धरली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश आल्याचं दिसून येतंय. उद्या (5 नोव्हेंबर) दुपारी १ वाजेपर्यंत तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नावे राज्याच्या प्रशासनाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पाठवायचे आहेत. त्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यावर सोपवण्यात आला आहे. राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकांची निवड लवकरच केली जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी काँग्रेसने केली होती. विरोधकांचे फोन टॅप रश्मी शुक्ला केल्या प्रकरणी यांच्यावर गुन्हे दाखल होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली. शुक्ला यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी पटोले यांनी पत्र लिहित निवडणूक आयोगाला केली. पटोलेंनी शुक्ला या भाजपला मदत करणाऱ्या अधिकारी असल्याचा आरोप केला होता. संजय राऊत यांनी देखील रश्मी शुक्ला यांच्या बदलीची वारंवार मागणी केली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.

 

 

 
Comments
Add Comment

खासदार नारायण राणे यांना वाढदिवशी मुख्यमंत्र्यांनी अशा दिल्या शुभेच्छा

कणकवली : नारायण राणे यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून केलेली भाषणे ऐकण्याची बघण्याची संधी मला प्राप्त

Nashik : नाशिक आणि जळगावच्या शेतकऱ्यांना शासनाचा मदतीचा हात

नाशिक : अवकाळी पावसाच्या तडाख्याने उध्वस्त झालेल्या नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई! प्रतिभा चाकणकरांना पोलिसांची नोटीस

- कोट्यवधींच्या व्यवहारांचा तपास तीव्र  भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून रुपाली चाकणकर

Crop registration : आता प्रत्येक हंगामात १०० टक्के पीक नोंदणी बंधनकारक

डिजिटल क्रॉप सर्वेक्षण होणार; तलाठी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या जबाबदाऱ्या

'Operation Tiger' : खासदार फुटी’च्या अफवांचे सूत्रधार उबाठाचेच नेते!

अपयशावरून लक्ष हटवण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’चे थोतांड; खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका मुंबई :

Pune FDA Action : पुण्यात एफडीएची कारवाई; मावळमध्ये भेसळयुक्त आंबा पल्प जप्त

पुणे : उन्हाळ्यात नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत