दहावी परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार ६ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.


राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. तर व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने कनिष्ठ महाविद्यालयातर्फे भरायचे आहेत. त्यासाठी ५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र आता अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे.


माध्यमिक शाळांनी अर्ज भरण्यापूर्वी शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची माहिती भरून मंडळाकडे पाठवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ऑनलाइन भरायचे असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमार्फत अर्ज भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अर्जात भरलेली माहितीची पडताळणी करून ती अचूक असल्याची खात्री शाळांनी करावी. विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रीलिस्ट ४ डिसेंबरपर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करायच्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

पुणेकरांसाठी मनपाचा उपक्रम; 'क्यूआर' स्कॅन करा अन विकासकामे सुचवा

पुणे :  पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या

'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख

सरकारने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसंदर्भातील दिली मोठी बातमी, काय सांगितलं?

नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे

जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत