Vasai Fort : वसईचा किल्ला १११ मशाली व ११ हजार १११ दिव्यांनी उजळला !

वसई : नरवीर चिमाजी आप्पा स्मारक, वसई किल्ला येथे 'आमची वसई' सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे 'वसई दुर्ग दीपोत्सव' उत्साहात साजरा करण्यात आला. १११ मशाली व ११,१११ दिव्यांनी वसईचा किल्ला (Vasai Fort) उजळून निघाला. 'आमची वसई' सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ऋषिकेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य उपक्रम राबविण्यात आला.


शनिवारी सायंकाळीपासून दीपोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. वसईतील कलाकारांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने रांगोळी व कंदील स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय धर्मसभेचे अध्यक्ष वेदमूर्ती धनंजय शास्त्री वैद्य उपस्थित होते.


पोर्तुगीजांच्या अमानुष जाचामुळे हतबल व असहाय्य झालेल्या वसईकरांना मुक्त करण्यासाठी २१००० मराठे हुतात्मा झाले, अनेकांच्या अर्धांगिनी स्वेच्छेने सती गेल्या. आपल्या घरी दिवाळी- दसरा साजरी व्हावा म्हणून त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा व जीवाचा त्याग केला. दिवाळीत एकीकडे संपूर्ण वसई - विरार शहर, घरे, दुकाने, मंदिर, चर्च, मॉल्स, रस्ते प्रकाशमान होऊन झगमगत असतात, तर दुसरीकडे पराक्रमी मराठा सैन्याच्या शौर्याचा व बलिदानाचा साक्षीदार असलेला दुर्ग जंजीरा वसईचा किल्ला मात्र अंधारात असतो. पूर्वापार काही स्थानिक परिवार व धर्मसभा वसई किल्ल्यातील नागेश महातीर्थ व नागेश्वर मंदिर परिसरात दीपावली साजरी करतात.


तसेच मराठा सैन्यामुळे व भारतीय जवानांमुळे आपण आज दिवाळी आनंदात साजरी करीत आहोत. त्या पराक्रमी सैन्यास मानवंदना अर्पण करण्यासाठी 'आमची वसई' सामाजिक संस्थेने दरवर्षीप्रमाणे वसई किल्ल्यात दीपोत्सव साजरा करण्याचे ठरविले. दीपोत्सवात पणत्या प्रज्वलित करून व रंगबेरंगी रांगोळ्या काढून, आकाशकंदील लावून नरवीर चिमाजी आप्पा स्मारक उजळवण्यात आले. प्रवेशद्वार, तटबंदी, सागरी दरवाजा, सतीचा पार, ध्वजस्तंभ, हनुमान मंदिर व नागेश महातीर्थावरही पणत्या व तोरण लावून रांगोळी काढण्यात आल्या. नरवीर चिमाजी आप्पा स्मारक, वसई किल्ला येथे 'वसई दुर्ग दीपोत्सव' साजरा करण्यात आला. १११ मशाली व ११,१११ दिव्यांनी वसईचा किल्ला उजळून निघाला.

Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.