योगी आदीत्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी
उत्तर प्रदेश : एकीकडे विधानसभा निवडणुकीची (Assembly Election 2024) रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे सातत्याने विरोधकांकडून धमकी व टीकास्त्र केले जात आहे. अशातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अज्ञात क्रमांकावरून आलेल्या मेसेजद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. यामध्ये ‘योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसांत राजीनामा दिला नाही, तर त्यांचे बाबा सिद्धिकीसारखे होईल’, असे लिहिले आहे. या घटनेनंतर राज्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे आणि अज्ञात व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केला आहे.