Weekly Horoscope:साप्ताहिक भविष्य,३ ते ९ नोव्हेंबर २०२४

Share

साप्ताहिक राशिभविष्य, ३ ते ९ नोव्हेंबर २०२४

बाजी जिंकाल

मेष : सरकारी नोकरी करणाऱ्यांनी खूप सावध राहिले पाहिजे. त्यांच्या कार्यक्षेत्रात काही जर चूक झाली तर त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो किंवा काही जातक वरिष्ठ पदावर आहेत, सामाजिक क्षेत्रात काम करतात, त्यांनी कुठल्याही सामाजिक संमेलनात भाग घेताना, आपली प्रतिमा मलिन होऊ नये याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या कालावधीमध्ये शत्रू तोंड वर काढण्याची शक्यता आहे. तुम्ही स्वतः शांत राहा. त्यांच्या विचाराशी सहमत व्हा. म्हणजे वाद-विवाद वाढणार नाही. प्रकृती समस्येबद्दल विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. बाकी सर्व सारासार विचाराने आपले प्रश्न सोडवाल. आत्मविश्वास वाढेल. बाजी जिंकाल.
.

आर्थिक फायदा होईल

वृषभ : विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. प्रकृती स्वास्थ्य चांगले असेल. या कालावधीमध्ये हॉटेल रेस्टॉरंट यांचा व्यवसाय चांगला चालेल. त्यांना आर्थिक फायदा होईल. त्याचप्रमाणे संगीत कला क्षेत्रातील लोकांना चांगल्या संधी येतील. खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जावे लागेल. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासात राहील. त्याचप्रमाणे मित्रांबरोबर मनोरंजनासाठीही बाहेर जातील. राजनीति क्षेत्रात काम करणाऱ्यांना हा कालावधी चांगला आहे. आपल्याला जर स्थावर मालमत्ता खरेदी करायची असेल तर हा कालावधी चांगला आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्ती विषयीचे असलेले तंटे सुटतील.

चांगले यश मिळेल

मिथुन : आपल्या बहीण-भावात वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. नात्यांना महत्त्व द्या. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आपल्या बोलण्याने आपले सहकारी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. आपल्या राहणीमानात उच्च बदल होणार आहेत. त्यासाठी जास्त खर्च होणार आहे. गुंतवणूक करताना खूप विचारपूर्वक केली पाहिजे. शेअर मार्केट किंवा स्टॉकमध्ये करू नये. मित्र किंवा कुटुंबासमवेत बाहेर जाण्याचा सहलीचा कार्यक्रम आखाल. मुले आनंदात असतील. विद्यार्थ्यांना या कालावधीमध्ये चांगले यश मिळेल. विवाहित व्यक्तींना वैवाहिक सुख मिळणार आहे. व्यावसायिक परिस्थिती समाधानकारक राहील.

सकारात्मक विचारांना प्राधान्य द्या

कर्क : सावध राहणे आवश्यक आहे. कारण जे जातक स्टॉक मार्केटमध्ये काम करत आहे त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त गुंतवणूक करू नये. घाईगर्दीत कुठलेही व्यवहार करू नका. महिला वर्गांनी खरेदीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा आर्थिक नियोजन गडगडण्याची शक्यता आहे. त्यावरून घरातील व्यक्तींशी वाद-विवाद होऊ शकतो. विवाहयोग्य मुलांसाठी चांगल्या घराण्यातून स्थळे येतील. सकारात्मक विचारांना प्राधान्य द्या. त्यामुळे आपली वाटचाल चांगली होईल. नवीन संधी येतील. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.

मंगल कार्य घडेल

सिंह :सकारात्मक विचारांना प्राधान्य द्याल. आपले लक्ष पुरे करण्यासाठी प्रयत्नशील राहाल, आपली तर स्वप्ने मोठी आहेतच पण त्या प्रमाणात आपली मेहनत कमी पडत होती. आता आपण जास्त मेहनत कराल व ध्येय प्राप्ती करून घ्याल. खासगी नोकरी करणाऱ्यांना सावध राहण्याचा इशारा आहे. सहकार्य वर्गाशी काही वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य व वैवाहिक सौख्य चांगल्या प्रकारे मिळणार आहे. मंगल कार्य घडेल.

नवीन बदल पोषक ठरतील

कन्या : व्यवसायामध्ये आपणास चांगल्या प्रकारे आर्थिक लाभ होणार आहे. प्रगतिपथावर राहणार आहात. व्यवसायात केलेले नवीन बदल व्यवसायासाठी पोषक ठरतील. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील मात्र वसुली करताना आपल्या बोलण्यावर तसेच वागण्यावरती नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येईल. संततीविषयी जे काही प्रश्न आणि चिंता होती त्यामध्ये मार्ग निघणार आहेत. मित्र-मैत्रिणींची सोबत आपणास आनंदित व उत्साहित करेल.

वातावरण सुखद राहील

तूळ :आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपणास खूप काम वाढणार आहे. नवीन जबाबदारी पण आपणास देण्यात येणार आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढणार आहे. वेळेमध्ये आपले टार्गेट पूर्ण होते की, नाही अशी आपणास शंका येणार आहे. पण आपण आपले काम वेळेत पूर्ण कराल. त्यामुळे आपले वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संबंध चांगले राहतील. ते आपणावर खूश होणार आहेत. त्यातून आपल्याला परदेशात सहलीचे बक्षीस मिळू शकते. आपणास या प्रवासामध्ये आनंद मिळणार आहे. कुटुंबातील वातावरण सुखद राहील. व्यापार-व्यवसायात आपल्या नवीन नवीन ओळखी होतील.

पूर्ण सहयोग मिळणार आहे

वृश्चिक : आपल्याला आर्थिक लाभ चांगल्या प्रमाणातच होणार आहेत. बरेच दिवस आपले कर्ज फिटत नव्हते ते कर्ज या कालावधीतमध्ये फिटून जाणार आहे. त्यामुळे आपल्याला मानसिक समाधान व शांतता मिळणार आहे. व्यापार व्यवसायामध्ये आपल्याला आपल्या बहीण-भावांचा पूर्ण सहयोग मिळणार आहे. व्यावसायिक जुनी येणी येतील. आपण व्यापार व्यवसायात नवीन गुंतवणूकही करू शकाल. आर्थिक मदत आपणास मिळणार आहे. त्यामुळे आपल्या व्यापार व्यवसायात आपल्याला प्रगती करण्यास वाव मिळणार आहे. मित्र-मैत्रिणींचा सहयोग.

सहज यश

धनु :आपल्या वैवाहिक जीवनामध्ये ऊन-सावलीची परिस्थिती निर्माण होणार आहे. आपली जवळची व्यक्ती आपल्या बदनामीला कारण होऊ शकते. याच कारणाने आपले वैवाहिक जीवन अस्थिर होऊ शकते. व्यक्तिगत आयुष्यामध्ये काही आव्हाने समोर येण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये तसेच आपल्या कुटुंबामध्ये वादविवाद सांभाळा. मानसिक संतुलन नीट ठेवून निर्णय घ्या सहज यश येणार आहे. मैत्रीमध्ये नवी मैत्री होऊ शकते.

प्रलोभनांपासून अलिप्त राहणे गरजेचे

मकर : आपल्याला बेकायदेशीर मार्गातून धनप्राप्ती करण्याची इच्छा होऊ शकते. किंवा काही गुप्तरितीने अर्थप्राप्ती करण्याचा योग आहेत. पण आपण लक्षात ठेवा अशा रीतीने पैसे कमावल्यास काही हातात येणार नाही. आपल्या कर्तृत्वावरच आपण आपले धन कमवावे. नोकरी करणाऱ्यांनी विशेषतः सरकारी नोकरीमध्ये असलेल्या जातकांनी लहान-मोठ्या प्रलोभनांपासून अलिप्त राहणे गरजेचे आहे. प्रेमी प्रेमिकांना काही आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. विरोध वाढू शकतो पण कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही, परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येईल. प्रेम प्रकरणात जोडीदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नका.

समस्या दूर होतील

कुंभ :आपण ज्या गोष्टीत हात घालाल त्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे. जर आपल्याला कारखान्याचे पुनर्निर्माण करायचे काम राहून गेलेले असेल तर, ते या काळामध्ये पूर्ण कराल. नवीन वाहन खरेदी करण्याचे योग आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या मनाजोगत्या संस्थेमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा होती, त्या संस्थेत किंवा इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना अॅडमिशन मिळू शकते. मनातील ही इच्छा पूर्ण होईल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. त्यांना शुभ समाचार मिळू शकतात. स्कॉलरशिप ही मिळू शकते. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न अथवा समस्या दूर होतील. विवाहयोग्य तरुण-तरुणींना आपला आवडता जीवनसाथी निवडता येईल. कौटुंबिक सुख मिळेल.

वादविवाद संपुष्टात येतील

मीन : आपली आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. आर्थिक लाभही मोठ्या प्रमाणात होतील. न मिळणारे पैसे देखील आपणास मिळतील. आपण आपल्या जोडीदाराच्या नावे गुंतवणूक करण्याची इच्छा असल्यास ती जर स्थिर मालमत्ता केली तर ती फायदेशीर ठरेल. आपल्याला आपल्या जवळच्या मित्राकडूनही आर्थिक लाभ होऊ शकतात. आपल्या कुटुंबामध्ये सुख-शांती आणि सद्भावना यांचे वातावरण असेल. असे वातावरण ठेवण्यासाठी आपणच जबाबदार असाल. कुटुंबासाठी कर्तव्यपूर्ती करण्याचे समाधान लाभेल. कुटुंबातील जुने वादविवाद संपुष्टात येतील. पती-पत्नीच्या संबंधात मधुरता येईल. कर्तव्यपूर्तीचे समाधान लाभेल.

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

1 hour ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

2 hours ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

2 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

4 hours ago