मतदारांना नव्या स्वरुपातील ओळखपत्र

पुणे: जुन्या कृष्णधवल (black and white) मतदार ओळखपत्राऐवजी स्मार्ट कार्ड स्वरुपात निवडणूक ओळखपत्र अर्थात 'इपिक’ कार्ड देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला. गेल्या दहा महिन्यांत पुणे जिल्ह्यातील ७ लाख ६० हजार ५५९ मतदारांना असे कार्ड वाटप करण्यात आले आहेत. मतदारांनी आठ क्रमाकांचा अर्ज भरल्यानंतर त्यांना घरपोच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्मार्ट कार्ड स्वरुपातील 'इपिक’ कार्ड दिले जाते. त्यामुळे मतदारांची ओळखही आता स्मार्ट बनली आहे.

'इपिक’ कार्ड म्हणजे काय?


'इपिक’ कार्ड म्हणजे 'इलेक्टेर्स फोटो आयडंटिफिकेशन कार्ड’ आहे. तर, या कार्डवर 'इपिक’ नंबर म्हणजेच मतदार ओळख क्रमांक दिलेला असतो. 'इपिक’ कार्डच्या वाटपाबाबत आम्ही पोस्ट विभागाला स्वतंत्र सूचना दिल्या आहेत. त्याशिवाय संबंधित मतदारांपर्यंत निवडणुकीपूर्वीच इपिक कार्ड द्या. ज्या मतदारापर्यंत इपिक कार्ड पोहोचणार नाही त्यांना मोबाइलद्वारे संपर्क करून त्यांच्यापर्यंत इपिक कार्ड पोहोचविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.
Comments
Add Comment

Shet Panand Raste Yojana : शेतकऱ्यांनो नियम पाळा, नाहीतर...आधार ब्लॉक होणार, ५ वर्षे सरकारी योजना बंद; शेतरस्ता योजनेची नवीन नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री

धक्कादायक! हॉस्पिटलच्या टीमनेच केला नवजात बाळाचा ३ महिन्यापेक्षा अधिक सांभाळ

सांगली : सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हॉस्पिटलमध्ये २६ नोव्हेंबर २०२५

Dr. Jaysingrao Pawar : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

- मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव

जालन्यात इंधन वितरणावर निर्बंध; पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेल वाटप

जालना: जालना शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साठा कमी पडत असल्यामुळे शहरातील

रामनवमीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते बंद राहतील

पुणे: देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या उत्सहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. प्रभू श्रीरामचंद्र

Ashok Kharat: व्हायरल व्हिडीओने खळबळ, अशोक खरात एचआयव्ही पॉझिटिव्ह?

मुंबई: महिलांवरील अत्याचार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाब अशोक खरात प्रकरणी दररोज नवे धक्कादायक