Sunday, July 6, 2025

Devendra Fadnavis : फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ; एकूण १८ जवान तैनात!

Devendra Fadnavis : फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ; एकूण १८ जवान तैनात!

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. फडणवीस यांना सध्या झेड प्लस सुरक्षा व्यवस्था होती. आता, त्यातही वाढ करत आता फोर्स वनचे चार अत्याधुनिक शस्त्रधारी कमांडो त्यांच्यासोबत असणार आहेत.


ऐन निवडणुकीच्या धामधुमीत फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. आता एकूण १८ जवान एका वेळी सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. यामध्ये गनमॅनच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. एसआयडीच्या गोपनीय रिपोर्टमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा अलर्टवर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याने ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा