ISRO : ‘इस्रो’कडून पुढच्या १५ वर्षांचा रोडमॅप तयार!

  60

आगामी वर्षात रोबो, २०२६ मध्ये अंतराळ मानवी मोहीम, २०४० मध्ये चंद्रावर


नवी दिल्ली : येत्या ३ महिन्यांत 'इस्रो'ची (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) गगनयान मोहिमेची पहिली मानवरहित मोहीम लाँच होणार आहे. ‘इस्रो’त (ISRO) त्याच्या पूर्वतयारीचीच लगबग सुरू आहे. दुसरीकडे, ‘इस्रो’ने पुढील १५ वर्षांत राबवायच्या मोहिमांच्या रोडमॅपवरही शेवटचा हात फिरवून झाला आहे. ‘इस्रो’ने त्यासाठी ४० वर्षांचे कॅलेंडरही तयार केले आहे. त्यातून भारतीय अंतराळ मोहिमांबाबतची माहिती उपलब्ध झाली आहे.


मानवरहित मोहिमेनंतर 'इस्रो' गगनयानातून ‘व्योममित्र’ नावाचा मानवसदृश रोबो पाठवणार आहे. एआयच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मदतीने या ‘व्योममित्र’ रोबोचे वर्तन अगदी मानवाप्रमाणे असेल. २०२५ च्या अखेरीस अथवा २०२६ व्या सुरुवातीस तीन दिवसांच्या पृथ्वी परिक्रमेसाठी २ भारतीय अंतराळवीर पाठवण्याची 'इस्रो'ची योजना आहे. २०२९ पर्यंत ३ मानवी मोहिमा अंतराळात राबवल्या जातील. मोहिमेला प्राप्त यशाच्या आधारावर अंतराळ फेण्या व वीरांची संख्याही वाढवली जाईल.



सहा उपग्रह पाठवणार


पुढच्याच वर्षी म्हणजे २०२५ मध्ये ‘इस्रो’ ६ उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे. नौदलासाठी जीसॅट-७ आर, लष्करासाठी जीसॅट-७ बी, ब्रॉडबैंड आणि इन-फ्लाईट कनेक्टिव्हिटीसाठी जीसॅट-एन २, सुरक्षा दले, निमलष्करी ३ दले. रेल्वेसाठी जीसॅट- एन ३, गगनयानासोबत कनेक्टिव्हिटीसाठी २ उपग्रहही लाँच केले जातील.



गगनयान काय ?


गगनयान या ३ दिवसांच्या मोहिमेत अंतराळवीरांना पृथ्वीच्या ४०० कि. मी. वरील कक्षेत पाठवले जाईल आणि नंतर सुरक्षितरीत्या समुद्रात उतरवले जाईल. यात यशस्वी ठरल्यास अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारत असा चौथा देश ठरेल.



‘इस्रो’चे कॅलेंडर



  • २०२५ - मनुष्य चंद्राच्या कक्षेत फिरून पृथ्वीवर परत येणार.

  • २०२७ - चांद्रयान-४ मिशन लाँच करणार, चंद्रावरून नमुने आणणार.

  • २०२८ - भारतीय अंतराळ स्थानकाचे मॉडेल-१ अंतराळात पाठवणार, स्वदेशी यान जोडणी प्रयोगही अंतराळात पार पडेल. अंतराळातच २ याने परस्परांना जोडली जातील.

  • २०३१ - चंद्रावर मानवी मोहीम.

  • २०३५ - अंतराळात भारताचे स्थानक उभारणार

  • २०३७ - भारतीय रोबो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार. शुक्रावर यान पाठवणार.

  • २०४० - चंद्रावर भारतीय पाऊल उमटवण्याची योजना.

Comments
Add Comment

Uttarkashi : धरालीतील 'कल्प केदार' मंदिराची दुर्दैवी पुनरावृत्ती; ८० वर्षांपूर्वी सापडले, आज पुन्हा गडप

धरालीचे प्राचीन शिवमंदिर ढगफुटीच्या तडाख्यात उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात

राहुल गांधींना सशर्त जामीन

चाईबासा : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना झारखंडमधील चाईबासा येथील विशेष खासदार-आमदार न्यायालयात

Uttarkashi : उत्तरकाशीत पूर आपत्तीची झळ अधिक तीव्र; पुराच्या तडाख्यात ६० बेपत्ता, मदतकार्यासाठी शर्यत सुरू

उत्तरकाशी : मंगळवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशीत एक धक्कादायक घटना घडली. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात

Eknath Shinde : शिंदेंची दौड पुन्हा दिल्लीत! शाह-मोदी भेटीत शिवसेनेच्या नाराजीचा हिशेब?

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्लीत दाखल

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत

नोवाक जोकोविचची ‘सिनसिनाटी ओपन’मधून माघार

नवी दिल्ली : ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविचला आगामी यूएस ओपनपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. त्याने सिनसिनाटी