मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) रणधुमाळीत सर्व राजकीय पक्षाकडून जय्यत तयारी सुरु आहे. मात्र अशातच काँग्रेस (Congress) पक्षाला धक्के बसत असल्याचे दिसून येत आहे. एकाचवेळी काँग्रेसला दुहेरी धक्का बसला आहे.
काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी आज पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला असून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना मुंबईतून भाजपाचं उपाध्यक्षपद दिले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार उपस्थित होते.
तर दुसरीकडे कोल्यापुरातील विद्यमान आमदार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी देखील काँग्रेसला रामराम केला आहे. जयश्री जाधव यांनी शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला असून त्यांना शिंदे शिवसेनेचं उपनेतेपद मिळाले आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…