एव्हरेस्ट सर करणाऱ्या १६ वर्षीय गिर्यारोहक काम्याला राज्यपालांकडून कौतुकाची थाप

मुंबई: वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहक काम्या कार्तिकेयनचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी अभिनंदन केले व तिला कौतुकाची थाप दिली.काम्याने आपले वडील कमांडर एस कार्तिकेयन व आई लावण्या यांचेसह राज्यपालांची भेट घेऊन त्यांना आपल्या एव्हरेस्ट व इतर शिखर गिर्यारोहण अनुभवाची माहिती दिली.

यावर्षी मे महिन्यात काम्याने नेपाळमधून माऊंट एव्हरेस्ट सर करुन भारतातील सर्वात तरुण आणि जगातील दुसरी सर्वात तरुण गिर्यारोहक होण्याचा मान मिळवला, असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले.मुंबईच्या नेव्ही चिल्ड्रन स्कूलची बारावीची विद्यार्थिनी असलेल्या काम्याने मिशन "साहस" अंतर्गत प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखरावर चढाई करण्याचा तसेच दोन्ही ध्रुवांवर स्की करण्याचा संकल्प केल्याचे तिने सांगितले.
Comments
Add Comment

सायन, कुर्ला बीकेसीतील प्रवाशांना मिळणार नवा पूल, वाहतूक कोंडी होणार दूर

मुंबई : मिठी नदीवर नवा पूल बांधण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिकेने

महापालिका आयुक्तांनी, अमित साटम यांच्या पत्राची दखल घेतली नाही आणि आता घडले असे...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेतील अभियंत्याच्या बदलीत मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असल्याने याबाबत

महाविकास आघाडीचे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले

मतदारयाद्या सदोष मुद्द्यांवर तपशीलवार खुलासा मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या

दादरमधील वाढत्या फटाक्यांच्या दुकानांना कुणाचे अभय? दुकानदारांसह नागरिकांचा जीव धोक्यात

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त केल्या जाणाऱ्या आतषबाजींकरता मुंबईतील काही प्रमुख दुकानांमध्ये

मालाड पूर्वेत भीषण आग! लाकडी गोदामात लागलेल्या आगीने घेतले रौद्ररूप: नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई : मुंबईतील वर्दळीच्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या मालाड पूर्व भागात आज दुपारी भीषण आगीची घटना घडली.

महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, आयुक्तांनी दिले असे आदेश..

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व