Anandacha Shidha : 'आनंदाचा शिधा' लांबणीवर! आचारसंहितेमुळे लाभार्थी वंचित

अमरावती : स्वस्त धान्याचा लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांना राज्य शासनाच्यावतीने १०० रुपयांत आनंदाचा शिधा (Anandacha shidha) दिला जातो. यावर्षी दिवाळीला मिळणारा आनंदाचा शिधा मात्र आचारसंहितेमुळे (Code Of Conduct) वितरित झाला नाही. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.


उत्सव काळात स्वस्त धान्य लाभार्थ्यांना शासनाच्यावतीने १०० रुपयांत चार प्रकारचे शिधा दिले जातात. दिवाळी सणानिमित्त मागील वर्षी शिधा वाटप करण्यात आलेले होते; परंतु यावर्षी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने आनंदाचा शिधा वितरणात अडचणी आहेत. विशेष म्हणजे, १ नोव्हेंबरपासून रास्त भाव दुकानदारांनी पुकारलेला बंद मागेघेण्यात आला असला, तरी लाभार्थ्यांना दिवाळीनंतरच धान्य मिळणार आहे. जिल्ह्यात शेकडो रास्तभाव दुकानाच्या माध्यमातून अंत्योदय, प्राधान्य गट योजनेचे हजारी लाभार्थी आहेत. या


सर्वांना सरकारने सण-उत्सव काळात आनंदाचा शिधा ही योजना रास्त दुकानाच्या माध्यमातून देणे सुरू केले. प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा मिळू लागला. या दिवाळीतही आनंदाचा शिधा मिळण्याची शक्यता होती; परंतु मध्येच आचारसंहिता सुरु झाल्याने ऐन दिवाळीत आनंदाचा शिधा वितरणात आडकाठी येत असल्याचे दिसून येते.

Comments
Add Comment

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८

‘अण्णांनी’ केलं ‘दादांना’ गारद

मोहोळांच्या रणनितीपुढे अजित पवार फिके; राष्ट्रवादीची पडझड पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी

मालेगाव महापालिकेत ‘इस्लाम’ची मुसंडी

मुंबई : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत इस्लाम पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून निवडणूक झालेल्या ८३

वसंतदादा पाटील यांची चौथी पिढी राजकारणात

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील वारसदार हर्षवर्धन पाटील यांनी

लातूरमध्ये कॉग्रेसचा ‘ हात’ भारी

अमित देशमुख यांनी चक्रव्यूह भेदले लातूर : दलित, मुस्लिम आणि लिंगायत मतांचा आधार घेत आखलेल्या रणनीतीला भाजपच्या