Tuesday, April 29, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar : शरद पवारांनी केलेली नक्कल अजितदादांच्या लागली जिव्हारी; म्हणाले, राष्ट्रीय...

Ajit Pawar : शरद पवारांनी केलेली नक्कल अजितदादांच्या लागली जिव्हारी; म्हणाले, राष्ट्रीय नेत्याला असली कृती शोभत नाही

शरद पवार (Sharad Pawar) यांची बारामती विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ काल कण्हेरी येथे सभा झाली. शरद पवार यांनी या सभेमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्या रडण्याची नक्कल केली. शरद पवारांनी अजित पवारांची केलेल्या नक्कलेची राजकीय वर्तुळात आता चांगलीच चर्चा रंगली आहे. याचदरम्यान शरद पवारांनी केलेल्या ‘नक्कल’वर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहे. प्रगल्भ नेते आहेत. त्यामुळे प्रगल्भ नेत्याने माझ्यासारख्या मुलाप्रमाणे असलेल्या माझी नक्कल करणे, साहेबांनी नक्कल करणे अनेकांना आवडलं नाही. युगेंद्र पवारांनी किंवा इतरांनी केलं असतं तर ठीक होतं, असं अजित पवारांनी म्हणाले. इतके दिवस वाटत होतं की, राज ठाकरेच नक्कल करतात, पण काल साहेब ही दिसले, असं अजित पवार म्हणाले. मी शरद पवार साहेबांना देव मानलं. त्यांनी माझी नक्कल केली. मी घरचा मुलगा होतो. माझी नक्कल त्यांनी करणे योग्य नव्हतं, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

मी साहेबांना दैवत मानलं आणि त्यांनी माझी नक्कल केली- अजित पवार

शरद पवारांना ज्या उंचीवर देश बघतो, महाराष्ट्र बघतो…त्या मोठ्या नेत्याने माझी नक्कल केलेली अनेकांना पटली नाही. मी रात्र-दिवस एक करुन, सगळीकडे जाऊन निवडणुकीत काम केलं आहे. शरद पवारांनी मुलाप्रमाणे असणाऱ्याची नक्कल केली, हे अनेकांना आवडलेलं नाही. मी रुमाल काढला नव्हता, त्यांनी रुमाल काढला. मी आईचं नाव घेतल्यानंतर थोडं भावनिक झालो होतो. कधी-कधी असं होतं. पण माझं रडणं नैसर्गिक पद्धतीने झालं, असं अजित पवारांनी सांगितले. पण मी साहेबांना दैवत मानलं आणि त्यांनी माझी नक्कल केली, याचं खूप वाईट वाटलं, अजित पवारांनी अशा भावना व्यक्त केल्या.

नेमकं प्रकरण काय?

अजित पवार शरद पवार घराण्यातील फुटीबाबत बोलताना भावूक झाले होते. डोळ्यात त्यांच्या अश्रू आले होते. मंगळवारी शरद पवार यांनी बारामतीमधील सभेत अजित पवार यांच्या रडण्याची नक्कल केली. या कृतीनंतर शरद पवारांच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -