Ranjith Balakrishnan : अभिनेत्याचा लैंगिक छळ! प्रसिद्ध दिग्दर्शकावर पुन्हा गुन्हा दाखल

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रंजित बालकृष्णन यांनी आतापर्यंत केलेले सर्व चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टीत दिग्गज दिग्दर्शक म्हणून यांची ओळख निर्माण झाली आहे. मात्र दुसरीकडे याच दिग्दर्शकावर लैंगिक छळ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.


बंगुळुरुमधील एका ३१ वर्षीय अभिनेत्याने दिग्दर्शक रंजीत बालकृष्णन यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. एका हॉटेलमध्ये बोलवून दिग्दर्शकाने अभिनेत्यावर लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अभिनेत्याने सांगितले की, तो दिग्दर्शक रंजितला पहिल्यांदा कोझिकोडमध्ये भेटला होता, जेव्हा ते दिग्दर्शक 'बावुतीयुदे नमाथिल' चित्रपटाचे शूटिंग करत होते. ऑडिशनच्या बहाण्याने त्याला हॉटेलमध्ये बोलावून जबरदस्तीने माझे कपडे काढायला लावले आणि लैंगिक छळ केला,अशी तक्रार अभिनेत्याने केली आहे.



अभिनेत्रीनेही केली लैंगिक छळाची तक्रार


याआधीही रंजीतवर एका बंगाली अभिनेत्रीने लैंगिक छळाचे आरोप केले होते. रंजितने तिला २००९ मध्ये 'पलेरी मणिक्यम' चित्रपटाच्या ऑडिशनच्या बहाण्याने बोलावून तिला अश्लील प्रकारे स्पर्श केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला होता.


तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणाऱ्या दिग्दर्शक रंजितविरोधात सततच्या होणाऱ्या या आरोपांमुळे चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Nag Panchami 2026 : नागपंचमीला 'या' 5 गोष्टी चुकूनही करू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

श्रावण महिन्यातील महत्त्वाच्या सणांपैकी एक म्ह

Nashik : 'मिशन ग्रीन मान्सून' चा रविवारी ८ वा टप्पा, ऑनलाइन नोंदणी केलेल्या नाशिककरांना होणार थेट देशी रोपांचे वाटप

Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि 'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत नाशिक शहर हरित व समृद्ध बनवण्यासाठी

Nashik : नाशिक महापालिकेत महापौर हिमगौरी आडकेंच्या हस्ते ध्वजारोहण

Nashik : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) राजीव गांधी भवन येथे महापौर हिमगौरी

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी

Nashik : नाशिकमध्ये वीर सैनिकांच्या स्मृतीसाठी ‘वीर प्रेरणास्थळ’ उभारणार, वीरनारी यांचा मंत्री महाजन यांच्या हस्ते धनादेश देऊन सन्मान

Nashik : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी भारतीय सशस्त्र सेनेतील नाशिक

Nashik : मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्र प्रदान

Nashik : जिल्ह्यातील ३९ अनुकंपा धारकांना आज स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर येथील