अपक्ष लढण्याच्या तयारीत
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) रणसंग्रामात सर्व राजकीय पक्षांची उमेदवारी यादी जाहीर होत आहे. मात्र अशातच भाजपाला (BJP) मुंबईतून धक्का बसला आहे. भाजपा पक्षामधील दोन नेत्यांनी बंडखोरी केली आहे. उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे भाजपा नेते गोपाळ शेट्टी (Gopal shetty) आणि अतुल शाह (Atul Shah) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे.
गोपाळ शेट्टी हे बोरिवली विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी आग्रही होते. मात्र भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे प्रचंड नाराज झालेल्या गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला.
त्याचबरोबर मुंबादेवी मतदारसंघाची जागा ही शिंदे गटाच्या वाट्याला गेली असून याठिकाणी भाजपाच्या नेत्या शायना एन. सी. यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेले भाजपा नेते अतुल शाह हे देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत.