Abhinav Arora : बाल संत अभिनव अरोराला बिश्नोई गँगकडून धमकी!

  132

मुंबई : बाल संत म्हणून सोशल मीडियावर व्हायरल असणाऱ्या अभिनव अरोराला (Abhinav Arora) बिश्नोई गँगकडून (Bishnoi Gang) जीवे मारण्याची धमकी आल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाद्वारे सामाजिक अत्याचार करण्याचा प्रयत्न देखील केला जात असल्याचा आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिन्याभरापासून अभिनव अरोराबाबत अपप्रचार सुरू आहे. त्याला वारंवार फोन करुन अपशब्द उच्चारले जातात. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जाते. अभिनवने भक्तीशिवाय इतर काहीच केले नाही. परंतु तरीही बिश्नोई टोळीकडून त्याला मारण्याची धमकी दिली जाते, असा दावा अभिनवच्या घरच्यांनी केला.

अभिनव अरोराची कोर्टात धाव

अभिनव अरोरा यांनी ट्रोल करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. युट्युबर बाल संत अभिनव अरोरा यांनी सात युट्युबर्सविरुद्ध एफआयआरची मागणी करत न्यायालयात धाव घेतली आहे. यावेळी त्याच्यासोबत त्याचे पालकही उपस्थित होते. अभिनव अरोरा यांनी मथुरेच्या एसीजेएम कोर्टात याचिका दाखल करून सोशल मीडियावर ट्रोल केल्याचा आणि धमकावल्याचा आरोप केला आहे.

अभिनव अरोरा म्हणाले की, प्रभू रामाचा हेतू अमली पदार्थांचे प्रदूषण थांबवण्याचा होता. त्यामुळे प्रभू राम यांना न्यायासाठी पुढे जाण्यास भाग पाडले गेले. असे उदाहरण देत 'मला कोर्टात जाण्याची इच्छा नव्हती, पण युट्युबर्सनी मला तसे करण्यास भाग पाडले', असे अभिनव अरोराने म्हटले.

Comments
Add Comment

Independence Day 2025: विकासाच्या वाटचालीत मोदी सरकारला साथ द्या: मंत्री मंगलप्रभात लोढा

गोंदिया:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मागील ११ वर्षांत जलद गतीने प्रगती साधली असून भारत

खडसेंच्या जावयावर आणखीन एक गुन्हा दाखल, महिलेचे चोरून फोटो अन् व्हिडिओ काढले...

प्रांजल खेवलकरच्या अडचणीत वाढ पुणे: एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचा पती प्रांजल खेवलकरच्या अडचणीत

Manoj Jarange Patil : मुंबई दौऱ्याआधीच जरांगेंची तब्येत बिघडली! नेमकं काय घडलं?

डॉक्टरांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला नांदेड: मराठा आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष संघर्ष करत असलेले मनोज

स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दिग्गजांचा अजित पवारांनी केला सत्कार

बीड : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी व

आंबा घाटात दरड कोसळली ! वाहतूक ठप्प

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर आंबा घाटात दरड कोसळण्याची गंभीर घटना घडली आहे. साखरपा मुर्शी चेक

मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताय तर वाहतुकीचे हे बदल पाहा

गणपती म्हटलं की कोकणकर गावाला जाणार नाही असं होत नाही. मात्र दरवर्षीप्रमाणे त्रासदायक असणारा मार्ग म्हणजे