मुंबई : 'बालवीर' आणि 'झासी की राणी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीने अवघ्या वयाच्या २२व्या वर्षीच स्वत:चे स्वप्न पूर्ण करताना दिसून येत आहे. टिव्हीवरील लोकप्रिय चेहरा अनुष्का सेनने (Anushka Sen) १७व्या वष्री बीएमडबल्यू गाडी खरेदी केली होती. त्यानंतर ती आता स्वत:च्या घराची मालकीणही झाली आहे. अनुष्काने मुंबईत स्वप्नातलं घर खरेदी केले आहे. सोशल मीडियावर नव्या घराच्या गृहप्रवेश पूजेचे फोटो शेअर करत तिने ही माहिती दिली.
अनुष्काने इन्स्टाग्रामवर तिच्या नवीन घराचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिच्यासह त्याच्या कुटुंबातील मंडळीही पूजा करताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना 'गृहप्रवेश, नवीन सुरुवात, नवीन घर, तुमचे आशीर्वाद कायम पाठीशी राहूद्या. ओम नमः शिवाय' असे कॅपश्न देखील दिले आहे.