Diwali 2024: मुंबईत फटाके फोडण्याबाबत BMCने जारी केले नवे नियम, ही आहे फटाके फोडण्याची वेळ

मुंबई: मुंबईत वायू प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी दिवाळीला फटाके फोडण्याबाबत मुंबई महापालिकेकडून नवे नियम जारी करण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेने दिवाळीसाठी गाईडलाईन जारी करताना सांगितले की मुंबईकर रात्री १० वाजेनंतर फटाके फोडू शकत नाही. सोबतच आवाजविरहित फटाके फोडण्याला प्राथमिकता देण्याचे अपील करण्यात आले आहे.


जारी केलेल्या नियमांनुसार, रोषणाई असलेला हा दिवाळीचा सण मुंबईकरांनी पर्यावरणासाठी अनुकूल पद्धतीने साजरा केला पाहिजे. सोबतच दिवे लावताना आणि फटाके फोडताना सुरक्षेला अधिक महत्त्व दिले पाहिजे. खासकरून मुलांनी सावधतेने फटाके फोडावेत. असे फटाके फोडावे ज्यामुळे कमीत कमी वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण होईल. आवाजविरहित फटाके फोडण्याला प्राथमिकता दिली पाहिजे.


नगरपालिकेने सांगितले की, मुंबईकर दिवाळीचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा सण साजरा करताना फटाक्यांची रोषणाई, पणत्या-दिव्यांची सजावट मोठ्या प्रमाणात होते. आतषबाजीमुळे वायू तसेच ध्वनी प्रदूषण होते. जर प्रदूषण रोखायचे असेल तर योग्य ती सावधगिरी बाळगली पाहिजे. यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल.



कमीत कमी फटाके फोडा, बीएमसीचे अपील


बीएमसीने म्हटले आहे की प्रदूषण नियंत्रित राखण्यासाठी नगरपालिकेकडून अनेक उपाय केले जात आहे. लोकांना दिवाळीदरम्यान फटाके फोडण्यासाठी रात्री १० वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. फटाकेही शक्य होईल तितके कमी फोडले पाहिजेत. यामुळे वायू प्रदूषण तसेच ध्वनी प्रदूषण कमी होईल. फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे मुले, गर्भवती महिला, वयस्कर तसेच अस्थमाचा त्रास असलेल्या लोकांना आरोग्यासंबंधित समस्या होतात.

Comments
Add Comment

'बाल आधार' नोंदणीतील त्रुटींनी पालक त्रस्त

यूआयडीएआयकडे तातडीने उपाययोजनेची मागणी लहान मुलांच्या नवीन आधार नोंदणी प्रक्रियेत कागदपत्रांमधील

पोलीस स्टेशनच्या आवारात सोयीसुविधांसह ५५ हजार घरे बांधणार

प्रकल्पाचा अभ्यास व शिफारसीसाठी समिती स्थापन मुंबई  :  गणेशोत्सव असो नवरात्रोत्सव

मुंबईच्या स्वच्छतेसाठी दरवर्षी झाडूंवर दीड कोटींचा खर्च!

मुंबई (प्रतिनिधी) :  स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाला झाडू खरेदीसाठी दरवर्षी दीड कोटी खर्च

अकरावीच्या प्रवेशासाठी ६ हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

अजूनही राज्यात ८ लाख ३५ हजार जागा रिक्तच मुंबई (प्रतिनिधी) :  शाळांचे वर्ग सुरू होऊन तीन महिने

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर देखभाल व सुधारणा कामांसाठी मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर विविध देखभाल, सिग्नलिंग आणि यार्ड रीमॉडेलिंगसाठी मेगाब्लॉक

पीएमजीपीच्या १७ अति धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा मुहूर्त निश्चित

डिसेंबरनंतर होणार कामांना सुरुवात मुंबई (प्रतिनिधी) : गेली अनेक वर्ष रखडलेल्या अंधेरी (पूर्व)