मुंबई : शिवसेनेने सोमवारी रात्री उशिरा तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये शायना एनसी यांना मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे.
दुसरीकडे भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांना कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने आपल्या कोट्यातून उमेदवारी जाहीर केली आहे.
शिवसेनेच्या तिसऱ्या यादीतील उमेदवार
सिंदखेडराजा- शशिकांत खेडेकर, घनसावंगी- हिकमत उढाण,कन्नड- संजना जाधव,कल्याण ग्रामीण- राजेश मोरे,भांडूप पश्चिम-अशोक पाटील, मुंबादेवी-शायना एनसी, संगमनेर-अमोल खताळ,श्रीरामपूर-भाऊसाहेब कांबळे,नेवासा-विठ्ठलराव लंघे पाटील,धाराशिव- अजित पिंगळे,करमाळा- दिग्विजय बागल,बार्शी- राजेंद्र राऊत,गुहागर- राजेश बेंडल,हातकणंगले- अशोकराव माने (जनसुराज्य पक्ष),शिरोळ- राजेंद्र पाटील येड्रावकर (राजश्री शाहूविकास आघाडी)