Radhakrishna Vikhepatil : इतके दिवस तुम्ही सामान्य माणसाला खेटलात, आता गाठ आमच्याशी आहे!

राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधकांवर आक्रमक पवित्रा


संगमनेर : संगमनेर तालुक्यात धांदरफळ येथे महायुतीची (Mahayuti) सभा झाल्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यावर विरोधकांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पालकमंत्री व महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhepatil) यांनी आक्रमक होऊन चांगलाच हल्लाबोल केला आहे.


'संगमनेर तालुक्यात आम्हाला येऊ देणार नाही, संगमनेर तालुका काय तुमच्या बापाचा आहे का? इतक्या दिवस तुम्ही सामान्य माणसाला खेटला होता आता गाठ आमच्याशी आहे', अशी आक्रमक पवित्रा राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांच्या विरोधात आक्रमक पवित्रा केला आहे.



संगमनेर तालुक्यात दहशतीचे राजकारण चालू


पुढे बोलताना ते म्हणाले की या संगमनेर तालुक्यात दहशतीचे राजकारण चालू आहे त्या दहशतीचे झाकण आम्ही उडवल्याशिवाय राहणार नाही सर्वसामान्य जनतेचा रोष तुमच्यावर आहे. यावेळी नक्कीच संगमनेर तालुक्यात परिवर्तन होणार. त्याचबरोबर तुम्ही महिलांना पुढे करून आंदोलन करत आहे, हे तुम्हाला शोभतं का? आमच्या राहता तालुक्यामध्ये येऊन सुसंस्कृतपणा दाखवायचा आणि लोकशाही आहे असं म्हणायचं मग आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या संगमनेर मध्ये जाळतात.


आमच्याकडे लोकशाही आणि तुमच्याकडे लोकशाही नाही का गाड्या जाळनाऱ्याना आम्ही सोडणार नाही. वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही त्वरित जाहीर निषेध केला. परंतु राजकारण करायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची अशी वृत्ती येथील लोकप्रतिनिधीची आहे. त्यामुळे आम्ही आता याला घाबरणार नाही, यावेळी संगमनेर ची जनता परिवर्तन करून दाखवणारच असेही विखे पाटील म्हणाले.

Comments
Add Comment

Congress: काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार जाहीर

मुंबई: अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेर राजकीय

Nanded Crime : टोळीयुद्धाने नांदेड शहर हादरले; एकाचा थेट रुग्णालयात घुसून खून

नांदेड शहरात शनिवारी (४ एप्रिल) मध्यरात्री पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला. येथील कुख्यात साईलाला आणि सदा

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातची ईडी चौकशी होणार - मुख्यमंत्री फडणवीस

सध्या राज्यासह देशात चर्चेत असलेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश

U-17 National Boxing Championship : गडकरींच्या हस्ते बॉक्सिंग स्पर्धेचा दमदार शुभारंभ!

- स्टेजवरूनच दिला जोशाचा पंच… नागपूरमध्ये बॉक्सिंगचा थरार रंगात! - ग्लोव्हज हातात… स्टेजवरून दिला जोशपूर्ण

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर!

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे बाटु विद्यापीठ प्रशासनाला कडक

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक