Akshaya Deodhar : पाठकबाई लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; दिसणार नव्या भूमिकेत!

मुंबई: ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्याचा पहिला भाग नुकताच पार पडला. या सोहळ्यादरम्यान वाहिनीकडून ‘लक्ष्मी निवास' या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. अनेक दिवसांपासून या मालिकेत मुख्य भूमिकेत कोण असेल याबद्दल चर्चा रंगल्या होत्या. आता त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

'तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरांत अक्षयाला ‘पाठकबाई’ म्हणून ओळख मिळाली. हीच अक्षया झी मराठी च्या नव्या को-या मालिकेतून चाहत्यांना भेटण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे .

काय आहे मालिकेची माहिती ?


आयुष्यभर आपल्या मुलांच्या इच्छेसाठी झटणाऱ्या एका वयोवृद्ध जोडप्याच्या आयुष्यावर ही गोष्ट आहे. ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेते तुषार दळवी हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. लक्ष्मी आणि श्रीनिवास या भूमिका हे दोघंही साकारणार आहेत.लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्या मुलीच्या भूमिकेत अक्षया देवधर दिसणार आहे. श्रीनिवास हे एका कार कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत असतात, तर लक्ष्मी गृहिणी असतात. आपल्या मुलींचं थाटामाटात लग्न व्हावं आणि आपण हक्काचं घर बांधावं असं यांचं स्वप्न असतं. या स्वप्नादरम्यानचा प्रवास ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्याला या तिघांनी उपस्थिती लावत या मालिकेविषयीची माहिती प्रेक्षकांना दिली होती.

 
Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

Dashavtar Box Office Collection: दशावतारच्या कमाईत होतेय जबरदस्त वाढ, कमावले तब्बल इतके कोटी...

मुंबई: बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेमांपर्यंत सर्वांवर सध्या मराठी सिनेमा दशावतार भारी पडत आहे. दिवसेंदिवस

अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

मुंबई: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये