भेसळयुक्त खव्याची मिठाई खाल्ल्याने होऊ शकतात हे आजार, रहा सावध

मुंबई: दिवाळीत नकली मिठाई बाजारात मोठ्या प्रमाणावर आढळते. यामागचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे सणांच्या दिवसांत मिठाईला खूप मागणी असते. खवा आणि दुधापासून बनवलेल्या मिठाईंमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ असते.खव्यामध्ये तर धोकादायक केमिकल मिसळले जातात. जसे कागद, रिफाईंड तेल, स्किम्ड मिल्क पावडर, युरिया, स्टार्च, माल्टोडेक्सट्रिन, सोडियम क्लोराईल, डिटर्जंट, हायड्रोजन पेरॉक्साईड आणि फॉर्मलडिहाईड,हे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असतात. इतकंच नव्हे तर यामुळे गंभीर आजारही होऊ शकतात.



खराब खव्याचा केला जातो वापर


मिठाईबद्दल बोलायचे झाल्यास यात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खव्याचा वापर केला जातो. अनेक दिवसांपासून ठेवलेला खवा गरम करून त्याला ताजे करून विकला जातो. दरम्यान, मिठाई असो वा खवा खरेदी करताना काही गोष्टींची खबरदारी जरूर घेतली पाहिजे. पदार्थ चांगले दिसण्यासाठी तसेच सुंगंधित बनवण्यासाठी अनेक प्रकारच्या केमिकल्सचा वापर केला जातो. मात्र ही केमिकल्स शरीरासाठी हानिकारक आहेत.



चांदीचा वर्ख पाहून खरेदी करा मिठाई


सणासुदीच्या काळात दुकानांवर चांदीचा वर्ख लावून मिठाई मोठ्या प्रमाणात विकली जाते. हा चांदीचा वर्ख आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. दरम्यान, वर्ख चांगला आहे की नाही याची खातरजमा करून मगच खवा खरेदी करा. तसेच रंगीबेरंगी मिठाई खरेदी करू नका. कारण रंगांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.



कॅन्सर होण्याचा धोका


मिठाईंमध्ये मोठ्या प्रमाणात रंगाचा वापर केला जातो. खाण्याच्या रंगाचा वापरही शरीरासाठी तितका चांगला नाही. दरम्यान, इतकंच नव्हे तर अनेक ठिकाणी रंगांमध्ये कार्बन तसेच मेटलही असतात. यामुळे आरोग्यास नुकसान पोहोचू शकते. अॅलर्जी, अस्थमासारखे आजार होऊ शकतात. दीर्घकाळापर्यंत अशी मिठाई खाल्ल्याने कॅन्सरही होऊ शकतो.

Comments
Add Comment

'बाल आधार' नोंदणीतील त्रुटींनी पालक त्रस्त

यूआयडीएआयकडे तातडीने उपाययोजनेची मागणी लहान मुलांच्या नवीन आधार नोंदणी प्रक्रियेत कागदपत्रांमधील

पोलीस स्टेशनच्या आवारात सोयीसुविधांसह ५५ हजार घरे बांधणार

प्रकल्पाचा अभ्यास व शिफारसीसाठी समिती स्थापन मुंबई  :  गणेशोत्सव असो नवरात्रोत्सव

मुंबईच्या स्वच्छतेसाठी दरवर्षी झाडूंवर दीड कोटींचा खर्च!

मुंबई (प्रतिनिधी) :  स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाला झाडू खरेदीसाठी दरवर्षी दीड कोटी खर्च

अकरावीच्या प्रवेशासाठी ६ हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

अजूनही राज्यात ८ लाख ३५ हजार जागा रिक्तच मुंबई (प्रतिनिधी) :  शाळांचे वर्ग सुरू होऊन तीन महिने

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर देखभाल व सुधारणा कामांसाठी मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर विविध देखभाल, सिग्नलिंग आणि यार्ड रीमॉडेलिंगसाठी मेगाब्लॉक

पीएमजीपीच्या १७ अति धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा मुहूर्त निश्चित

डिसेंबरनंतर होणार कामांना सुरुवात मुंबई (प्रतिनिधी) : गेली अनेक वर्ष रखडलेल्या अंधेरी (पूर्व)