ST Bus : दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा!

  53

पुण्यासाठी ३०, छत्रपती संभाजीनगरसाठी १०, धुळ्यासाठी २० हून अधिक फेऱ्या


नाशिक : दिवाळीला सोमवारपासून सुरूवात होणार असून या कालावधीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता नाशिक राज्य परिवहन विभागाच्या (State Transport Department) वतीने पुणे, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजी नगर, बोरिवली, कसारा मार्गावर अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.


पुण्यासाठी ३० हून अधिक, छत्रपती संभाजीनगरसाठी १० आणि धुळ्यासाठी २० हून अधिक फेऱ्या होणार आहेत.. विभागातंर्गत असलेल्या मालेगाव, सटाणा, मनमाड, नांदगाव, इगतपुरी, लासलगांव, कळवण, पेठ, पिंपळगाव या आगारांमार्फतही विविध मार्गावर अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत.


मालेगाव, सटाणा, येवलासाठी जादा बससेवेचे नियोजन आहे. महिला सन्मान योजनेतंर्गत महिलांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सवलत दिली जात आहे. तसेच नाशिक-पुणे मार्गावर शिवशाही सेवा प्रकारातील अतिरिक्त फेऱ्या आरक्षणासाठी उपलब्ध केलेल्या आहेत. प्रवाशांनी या अतिरिक्त फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. महामंडळाच्या वतीने साधी बस तसेच वातानुकूलित बससेवेत कुठल्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आलेली नाही.

Comments
Add Comment

Nagpur Temple Collapsed: महालक्ष्मी मंदिरातील निर्माणाधीन छत कोसळले, १७ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

कोराडीच्या महालक्ष्मी मंदिर परिसरातील घटना नागपूर:  नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या महालक्ष्मी मंदिर

पुणे जिल्ह्याचा कायापालट होणार , ३ नव्या महापालिका तयार होणार

पुणे : पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठी

महाराष्ट्रातील सरपंचांना दिल्लीत मोठा मान

महाराष्ट्रातील १७ सरपंचांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीतून आमंत्रण नवी दिल्ली : यंदाच्या

जमीन विक्रीस हरकत घेणा-या आईचा गळा घोटला; नंतर केली आत्महत्या

लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे जमीन विक्रीच्या वादातून मुलाने वयोवृद्ध आईचा खून

अमरावतीत आईने मुलीला तर आत्याने भाच्याला दिले जीवनदान

अमरावती : संदर्भसेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) गेल्या दोन दिवसांत दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात आईने

महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा तत्काळ लागू करावा

मानसिक छळ, मारहाण, लैंगिक अत्याचार, आत्महत्येसारखे गंभीर प्रकार पुणे: महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा