Dryfruits Price Hike : दिवाळी फराळ महागला! सुकामेवा, खोबरे, तेल, डाळींची दरवाढ

मुंबई : दिवाळी सण काही दिवसांवर येवून ठेपला असून अनेक घरात दिवाळी फराळ बनवण्याची सुरुवात झाली आहे. मात्र ऐन दिवाळीत फराळ बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सुका मेवा, तेल, तूप, रवा साखर, खोबरे यांच्या दरात वाढ झाली आहे. तेल, तूप, साखर, गूळ, रवा यांच्या किंमती १० ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर सुका मेव्याच्या किंमतीत पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर, तेल, खोबऱ्यांसह डाळीदेखील महाग झाल्या आहेत.



सुका मेव्याचे दर काय?



  • सध्या काजू घाऊक बाजारात ८९५ रुपये तर पिस्ता १ हजार ९० रुपये, मनुके २०० रुपये प्रतिकिलोवर आहेत.

  • किरकोळ बाजारात काजूचे दर १ हजार १०० रुपये आहे. चोरोळीचा दर २ हजार ५०० रुपये, वेलची ३ हजार रुपये किलो, खजूर २०० रुपये, पिस्ता १ हजार ८०० रुपये, मनुके ३०० रुपये किलोवर विकले जात आहे.

Comments
Add Comment

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या

बीडमध्ये पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू

बीड : बीडच्या (Beed) अंबाजोगाईमध्ये (Ambajogai) पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.